लोहारा विद्यालयाने आवारात बहरवली सेंद्रिय पालेभाजी शेती
भाजीपाल्याचा मध्यान शालेय पोषण आहार व वस्तीगृह विद्यार्थ्यांसाठी होणार विनियोग : शिक्षणाबरोबर शेतीचे कृतीजन्य ज्ञान
हर्षल राजपूत
लोहारा ता. पाचोरा
येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयाने आवारात सेंद्रिय शेतीची परसबाग बहरवली असून शेतीची या पालेभाज्यांचा वापर शालेय पोषण मध्यान आहार व वस्तीगृह विद्यार्थ्यांसाठी केला जात असून विद्यार्थ्यांना या माध्यमातून आहारातून जीवनसत्त्वाचा पुरवठा करण्याचे काम विद्यालयाच्या माध्यमातून होत असल्याने कौतुक होत आहे.
शासनाचे कागदोपत्री उद्दिष्ट पूर्ण करण्याचे काम अनेक विभागातून होते. मात्र तसे न करता या विद्यालयाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत तीन महिने अगोदर भेंडी, वांगे, टोमॅटो, गिलके, कोबी, भोपळा, चवळी, कोथिंबीर पोकळा, मोहरी, वाल ही पालेभाजी व पालेभाजीवर्गीय यांची लागवड केली आता सध्या भेंडी, चवळी, वांगी, टोमॅटो, कोथिंबीर, पोकळा भाजीपाला उपलब्ध होत आहेत. अन्य उरलेली काही दिवसातच त्यांना उपलब्ध होतील.

या शेतीला कंपाउंडचे संरक्षण दिलेले असल्यामुळे उपद्रवीतांची कुठल्याही प्रकारचे भय राहिलेले नाही उत्कृष्ट अशा या परसबाग सेंद्रिय शेतीचे शासनाच्या समितीनेही विद्यालयाचे कौतुक केले आहे. या सेंद्रिय शेतीसाठी मुख्याध्यापक सौ. यु. डी. शेळके, पर्यवेक्षक पी. एम. सुर्वे यांचे मार्गदर्शनाखाली शिक्षक ए. जी. घोंगडे, एस. टी. तडवी, एस. एम. सिसोदे, शिपाई मधुकर पवार, वस्तीगृहाचे दत्तात्रय पाटील हे परिश्रम करून देखभाल करतात
ही संकल्पना विचारात होतीच, पण मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रपाने लवकर राबविणे शक्य झाले. या पालेभाज्यांच्या वापर मध्यान भोजन व वस्तीगृह विद्यार्थ्यांसाठी वापर होत आहे. कर्ता व करवत्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विषमुक्त आहार सेवन करत पाहताना आनंद होतो. या भाजीपाला व फळवर्गीय यांचा कालावधी झाल्यानंतर ती काढणी करून घेतली जाईल. त्यावर पुन्हा नवीन लागवड केली जाईल.
सौ. यु. डी. शेळके, मुख्याध्यापक