Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»हवामान»बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता
    हवामान

    बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता

    ‘या’ तारखेनंतर पावसाच्या सरी बरसणार : तापमानही वाढणार
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 8, 2026No Comments364 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    राज्यात पावसाने अनेक जिल्ह्यात दडी मारली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पिके पाण्याअभावी पिवळी पडत आहेत. पाऊस केव्हा परतणार याची शेतकरी वाट पाहात असताना आता नागपूर सह संपूर्ण विदर्भात येत्या ११ तारखेपर्यंत पावसाची प्रतिक्षा करावी लागणार आहे. आता ११ तारखेनंतर बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे.

    नागपूर सह संपूर्ण विदर्भात पावसाने ओढ दिल्याने बळीराजा चिंतेत आहे. बळीराजाची पिके पाण्याअभावी वाळली जात आहे. सोयाबिन आणि इतर पिकांवर मोठा परिणाम झाला आहे. त्यात आता हवामान खात्याने वर्तवलेल्या भविष्यानुसार आता येत्या 11 तारखेपर्यंत पावसाची वाट पाहावी लागणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 11 तारखे नंतर बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन विदर्भात सर्वत्र ढगाळ वातावरण होईल असे हवामान खात्याने म्हटले आहे. यात आता दिलासादायक बाब म्हणजे 12 ते 14 सप्टेंबरला विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही जिल्ह्यात साधारण पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    सध्या 11 तारखे पर्यंत पावसाचा अंदाज असला तरी तापमानात मात्र वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भात तापमानात साधारणतः 3 ते 4 अंश सेल्सियस पर्यंत वाढ होऊन तापमान 32 अंश पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. विदर्भात साधारणतः 30 टक्के पर्यंत पावसाची तूट निर्माण झाली असून कमी पावसामुळे ही तूट सध्या तरी भरून निघण्याचा शक्यता दिसत नाही असे नागपूर हवामान विभागाचे संशोधक डॉ.प्रवीण कुमार यांनी म्हटले आहे.

    भारतीय हवामान खात्याच्या मॉडेलनुसार, महाराष्ट्राच्या काही भागांसह मध्य भारतातील काही क्षेत्रांमध्ये पावसाचा पुढील चांगला टप्पा १३ ते १५ सप्टेंबरच्या सुमारास येण्याची शक्यता आहे वर्तवण्यात आली आहे. यात राज्याच्या अंतर्गत भागांना लाभ होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या उत्तरार्धातही पावसाची चांगली सक्रियता दिसून येऊ शकते असे हवामान खात्याने म्हटले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif