हॉटेल मैत्री कॅफेमध्ये विणले जात होते अश्लीलतेचे जाळे

पार्टिशन करून तरुणाईला अश्लील वर्तनाला दिली जागा

0

 

लोकशाही न्यूज नेटवर्क

एरंडोल : येथील बस स्टॅन्ड समोरील गोटू महाजन कॉम्प्लेक्स येथे मैत्री कॅफे नावाने कॅफे चालवला जात होता. कॅफेच्या नावाखाली तरुण-तरुणी यांना कॅफेच्या आत छोटे छोटे असे पार्टिशनचे कंपार्टमेंट करून तेथे कॅफे चालक रवींद्र दिनकर पाटील वय वर्ष 23 राहणार जवखेडे हा अश्लील चाळे व असभ्य कृत्य करण्यास मुभा देत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांना मिळाली होती त्या अनुषंगाने त्यांनी लागलीच आपल्या सहकाऱ्यांना बोलवून सदर कॅफेवर धाड टाकण्यास सांगितले.

बस स्टॅन्ड समोरील गोटू महाजन कॉम्प्लेक्स येथे मैत्री कॅफे येथे पोलीस प्रशासनाने 9 जुलै रोजी दुपारी 1:30 दरम्यान अचानक धाड टाकली असता या कॅफेमध्ये एका कंपार्टमेंट मध्ये एक तरुण एक तरुणी तर दुसऱ्या कंपार्टमेंट मध्ये एक तरुण व एक तरुणी हे अश्लील चाळे व असभ्य वर्तन करताना आढळून आले. सदर तरुण-तरुणी यांची चौकशी केली असता यांचे वय 18 वयापेक्षा जास्त असल्याचे आढळून आले.

सदर तरुण तरुणींना सदरची जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाची परवानगी आहे का याबाबत चौकशी केली असता कॅफे चालकाकडे कुठल्याही प्रकारची परवानगी नसल्याचे आढळून आले. दरम्यान रवींद्र पाटील याला ताब्यात घेण्यात आले असून भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 294 (2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

एरंडोल येथील वस्तीच्या परिसरात अशा प्रकारचे कॅफे सुरू होते मात्र पोलीस प्रशासनाने याची तात्काळ दखल घेतल्याने याला वेळेवर अटकाव करण्यात आल्याने पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील, किरण पाटील, दीपक पाटील, अनिल पाटील, वैशाली पाटील यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.