Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»सुटकेचा निश्वास ! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली
    महाराष्ट्र

    सुटकेचा निश्वास ! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 9, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क

    गणेशोत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने आज एक ऐतिहासिक आणि निर्णायक निर्णय दिला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस (POP) पासून तयार केलेल्या गणेश मूर्तीवरील बंदी हटवण्यात आली असून, या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील मूर्तिकार, व्यापारी आणि गणेश मंडळांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.मुंबई हायकोर्टाच्या निर्णयानुसार, आता POP मूर्तींची निर्मिती आणि विक्री कायदेशीररित्या परवान्याने होऊ शकते. मात्र या मूर्तींचे विसर्जन हे फक्त कृत्रिम जलस्रोतांमध्येच केले जाईल, नैसर्गिक जलसाठ्यांमध्ये नव्हे. या निर्णयावर न्यायालयात दोन्ही पक्षांनी सहमती दर्शवली आहे.

    मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठाने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत की, तीन आठवड्यांच्या आत एक तज्ज्ञ समिती स्थापन करून विसर्जन प्रक्रिया आणि पर्यावरणपूरक उपाययोजना यांची माहिती सादर करावी. या समितीच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम तलावांची निर्मिती, पीओपीचे साठवण आणि पुनर्वापर यासाठी उपाययोजना केल्या जातील.

    या निर्णयामुळे हजारो मूर्तिकारांना दिलासा मिळाला आहे. अनेक मंडळांनी यापूर्वीच POP मूर्तींची ऑर्डर दिली होती. आता त्या मूर्तींच्या विक्रीवर कोणताही अडथळा राहिलेला नाही. मात्र, विसर्जनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे.

    शाडू मातीच्या मूर्ती हे पर्यावरणपूरक मानले जात असले तरी, त्यांच्या निर्मितीची मर्यादा आणि खर्च अधिक असल्याने अनेक मूर्तिकार आणि मंडळे POP मूर्तींवर अवलंबून आहेत. याच मुद्द्यावरून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि कोर्टाने आता परिस्थितीनुरूप तडजोडीचा निर्णय घेतला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    POP Ganesh idols
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र

    November 9, 2026

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif