पूजा खेडकरचे वडील विधानसभा निवडणूक लढवणार

स्वतः दिली माहिती : पक्ष आणि मतदारसंघही ठरला

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

लोकसभा निवडणुकीनंतर सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दररोज विविध मतदारसंघातून अनेक इच्छुकांची नावे समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एका मोठ्या नावाची भर पडली आहे. निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून पूजा खेडकर ही राज्यासह देशभरात चर्चेत आहे. पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी स्वत: याबद्दलची माहिती दिली.

निलंबित आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या वडील दिलीप खेडकर यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची मोठी घोषणा केली आहे. दिलीप खेडकर हे सध्या निवडणुकीची तयारी करत आहेत. अहिल्यानगरच्या शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून दिलीप खेडकर हे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोललं जात आहे. पूजाचे वडील दिलीप खेडकर यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

लोकसभा निवडणुकीत जरी माझा पराभव झालेला असला तरी प्रस्थापितांना त्यांचा पराभव माझ्यामुळे झाला असे वाटत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीने मला आणि माझ्या कुटुंबियांना त्रास देण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे तुम्ही जर मला राजकारणातून संपवण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असाल, तरी मी विधानसभेची निवडणूक लढवणार आहे, असे पूजा खेडकरेचे वडिलांनी म्हटले आहे.

मला भाजपकडून आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. पण जर भाजपने उमेदवारी दिली नाही, तर इतरही पक्षाकडून मला ऑफर मिळत आहे. त्यामुळे आता दिलीप खेडकर यांना कोणत्या पक्षातून निवडणुका लढवतात, त्यांना कोणता पक्ष उमेदवारी देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.