Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»नवीन एसटी बस उद्घाटनाच्या नियोजनावरून यावलमध्ये राजकारण तापले
    राजकारण

    नवीन एसटी बस उद्घाटनाच्या नियोजनावरून यावलमध्ये राजकारण तापले

    यावल आगार प्रमुखांवर निलंबनाची टांगती तलवार?
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 24, 2026No Comments347 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क

    नवीन एसटी बसच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनावरून यावल शहरासह रावेर-यावल आणि चोपडा-यावल विधानसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

    कार्यक्रमाच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या बॅनरवर काही लोकप्रतिनिधींची छायाचित्रे लावण्यात आली असताना, एसटी महामंडळाच्या संदर्भातील महत्त्वाच्या नेत्यांसह चोपडा-यावल संयुक्त विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे छायाचित्र नसल्याने वाद निर्माण झाला आहे. तसेच यावल नगरपरिषदेच्या उभाठा गटाच्या लोकनियुक्त अध्यक्षा यांना प्रोटोकॉलप्रमाणे वागणूक मिळाली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

    या कार्यक्रमाच्या नियोजनात यावल आगार प्रमुखांकडून गंभीर चूक झाल्याची चर्चा सुरू आहे. एसटी महामंडळाच्या नवीन बसच्या उद्घाटनासारख्या शासकीय कार्यक्रमात संबंधित लोकप्रतिनिधींना समान स्थान देणे अपेक्षित असताना आमदार चंद्रकांत सोनवणे यांचे छायाचित्र बॅनरवर नसल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे जिल्हास्तरापासून दिल्लीपर्यंतच्या विविध लोकप्रतिनिधींची छायाचित्रे बॅनरवर असताना स्थानिक विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदारांचे छायाचित्र नसणे हा केवळ तांत्रिक प्रकार आहे की नियोजनातील हलगर्जीपणा, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

    या प्रकारामुळे यावल शहरासह रावेर-यावल आणि चोपडा-यावल विधानसभा क्षेत्रातील राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी गटातीलच लोकप्रतिनिधींना कार्यक्रमातून किंवा प्रसिद्धी साहित्यामधून डावलण्यात आल्याने आगार प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रकरणाची वरिष्ठ स्तरावर दखल घेतली जाण्याची शक्यता असून, यावल आगार प्रमुखांच्या नियोजनाची चौकशी होण्याची चर्चा आहे. दोष निश्चित झाल्यास संबंधित आगार प्रमुखांवर निलंबनासह प्रशासकीय कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    दरम्यान, हा प्रकार नेमका कोणाच्या सूचनेनुसार घडला, बॅनर तयार करताना संबंधित लोकप्रतिनिधींची नावे व छायाचित्रे का तपासण्यात आली नाहीत आणि कार्यक्रमाच्या नियोजनाची जबाबदारी नेमकी कोणाची, याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे. यावल आगाराच्या बॅनरमुळे निर्माण झालेला हा वाद आता केवळ कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता प्रशासकीय नियोजनातील त्रुटी आणि स्थानिक राजकारणाच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे. वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif