x hockey products coupons netrition supplements coupons new harmony soap coupon jcpenney online coupon august 2012
Friday, December 2, 2022

गुलाबराव पाटलांच्या समर्थकांनी केला संजय राऊतांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

ना. गुलाबराव पाटील यांच्या समर्थनार्थ जळगाव शहरामध्ये शिव कॉलनीजवळ राष्ट्रीय महामार्गावरती गुलाबराव पाटील समर्थक शिवसैनिकांनी पाठींबा देऊन संजय राऊत यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.

- Advertisement -

यावेळी गुलाबराव पाटील समर्थक शिवसैनिक सुनील ज्ञानेश्वर पाटील यांनी सांगितले की, ना. गुलाबराव पाटील यांनी गेल्या तीस वर्षांपासून शिवसेनेसाठी भरपूर काम केले. तसेच तीस पस्तीस केसेस अंगावर घेतल्या आणि संपूर्ण जिल्हा नव्हेच तर उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना मजबुतीसाठी अहोरात्र काम केले.

- Advertisement -

तसेच शिवसेनेचे संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर टीका केल्याबद्दल सर्व शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.  यामुळे त्यांनी संजय राऊतांचा निषेध केला. तसेच गुलाबराव पाटील समर्थक यांनी यापुढे येऊन अतिशय जोमाने काम करण्याचा मानस व्यक्त केला.

यासाठी गुलाबराव पाटील समर्थनार्थ त्रिमूर्ती कॉलेजचे संस्थापक मनोज पाटील, भूषण पाटील, सचिन गोळबे, भरत पवार, संजय महाजन, गणेश राठोड, अमित तिवारी, राहुल पाटील, डॉ. गजानन पाटील, अॅड सुनील पाटील,  राहुल नवल पाटील, संदीप भालेराव, शेखर साळुंखे,  प्रल्हाद महाजन आदी उपस्थित होते.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या