खुशखबर.. राज्यात लवकरच 7231 पोलिस पदांची होणार भरती

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लवकरच राज्यात 5297 पदांची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अशी खूशखबर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (State Home Minister Dilip Walse Patil) यांनी दिली.

महाराष्ट्र पोलीस दलातील 7231 कॉन्स्टेबल पदांची भरती लवकरच करण्यात येणार आहे. पोलीस भरतीसाठी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. या पदाची भरती करताना कोणत्याही प्रकारचे गैरप्रकार होऊ दिले जाणार नाहीत. ही भरती पारदर्शक पद्धतीने केली जाईल. अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

तसेच वळसे पाटील म्हणाले की, पोलीस दल अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न आहेत. याअंतर्गत पोलीस ठाण्यांच्या तसेच पोलीस क्वार्टर्सच्या ज्या ब्रिटिशकालीन तसेच जुन्या इमारती आहेत त्यांची दुरुस्ती तसेच नवीन इमारती बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल.

दरम्यान राज्य राखीव पोलीस दलात असलेल्यांना पोलीस दलात सामावून घेण्यासाठी 15 वर्षं सेवेची असलेली अट आता 12 वर्षे करण्यात आली आहे. होमगार्डनाही वर्षातून कमीत कमी 120 ते 150 दिवस काम देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्याचप्रमाणे पोलीस दलात शिपाई पदावर भरती होणाऱ्या पोलिसांना कालबद्ध पदोन्नती देऊन पोलीस उपनिरीक्षक पदावर बढती देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.