Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»रिंगरोडवरील स्पावर पोलिसांची धडक; सहा तरुणींची सुटका
    गुन्हे वार्ता

    रिंगरोडवरील स्पावर पोलिसांची धडक; सहा तरुणींची सुटका

    rajelok11@gmail.comBy rajelok11@gmail.comSeptember 2, 2026No Comments494 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    दामिनी पथकाची कारवाई; डमी ग्राहकाच्या माध्यमातून गैरप्रकाराचा घेतला शोध

    जळगाव : शहरातील रिंगरोड परिसरातील एका स्पा सेंटरवर जळगाव पोलिसांच्या दामिनी पथकाने कारवाई करत सहा तरुणींची सुटका केली. मसाजच्या नावाखाली स्पामध्ये कथित गैरप्रकार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पडताळणी करून छापा टाकण्यात आला. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर दामिनी पथकाने संबंधित स्पा सेंटरच्या हालचालींवर काही दिवस लक्ष ठेवले. माहितीची खातरजमा करण्यासाठी डमी ग्राहकाच्या माध्यमातून पोलिसांनी कारवाईपूर्वीची प्रक्रिया राबवली. यावेळी मिळालेल्या माहितीसह आवश्यक पुरावे संकलित करण्यात आले. त्यानंतर पथकाने अचानक स्पा सेंटरमध्ये प्रवेश करून कारवाई केली.

    या छाप्यात सहा तरुणी आढळून आल्या. त्यांची पोलिसांनी सुटका केली. सुटका करण्यात आलेल्या तरुणींमध्ये पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग, मणिपूरमधील तामेंगलोंग, पूर्व सिक्कीम आणि नेपाळमधील बांके येथील तरुणींचा समावेश आहे. या तरुणी स्पामध्ये मसाज थेरपिस्ट म्हणून कार्यरत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

    दरम्यान, या सहा तरुणींमध्ये नेपाळमधील एका तरुणीचा समावेश असल्याने तिच्या भारतातील प्रवेशासंदर्भातील कागदपत्रांची पोलिसांकडून तपासणी केली जात आहे. पासपोर्ट, व्हिसा तसेच भारतात प्रवेशाची वैधता याबाबत संबंधित यंत्रणांच्या माध्यमातून पडताळणी सुरू आहे.

    पोलिसांच्या नोंदीनुसार, नीरज सिंग पंड्या (रा. मुखर्जी नगर, रतलाम, मध्य प्रदेश) हा स्पा सेंटरचा चालक व परवानाधारक आहे. तर राजेंद्र पुंडलिकराव चव्हाण (रा. यशवंत कॉलनी, रिंगरोड, जळगाव) हा संबंधित जागेचा मालक व परवानादाता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दोघांविरुद्ध जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकाने ही कारवाई केली. महिला पोलीस हवालदार वैशाली किशोर माळी, महिला पोलीस कॉन्स्टेबल मोनु उत्तम घुले, अंजली नवलसिंग राजपूत, रीना महाजन, आरसीपी जवान ज्ञानेश्वर विठ्ठल पाटील आणि अतीन संतोष थोरात यांनी कारवाईत सहभाग घेतला. जळगाव उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, प्रोबेशनरी उपअधीक्षक सह्याद्री बिर्ले, जिल्हा पेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या सहायक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक भूषण कोल्हे यांच्यासह अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी कारवाईत सहकार्य केले.

    पोलीस हवालदार दीपक पाटील, किरण धनगर, मनीषा पाटील, महिला पोलीस कॉन्स्टेबल राखी खाटिक, पोलीस हवालदार महेश महाजन, महिला पोलीस हवालदार अनिता वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत लाड, समाधान पाटील आणि प्रवीण जाधव यांचाही पथकात समावेश होता. या प्रकरणाचा पुढील तपास जिल्हा पेठ पोलीस ठाण्याकडून सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    rajelok11@gmail.com

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif