Friday, May 20, 2022

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; 4 शिक्षकांसह 12 जण ताब्यात

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

मुक्ताईनगर शहरात अवैधरित्या पत्ता जुगार सुरु असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिसांनी मिळाली. या माहितीनुसार मुक्ताईनगर पोलीसांनी मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजता क्लबवर छापा टाकला. याप्रकरणी बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यात चार शिक्षकांचा देखील समावेश आहे.

- Advertisement -

मुक्ताईनगर शहरातील आदर्श शाळेच्या रस्त्याने किशोर बोदडे यांचे घराजवळ सार्वजनिक जागी अवैधरित्या जुगार सुरु होता. मंगळवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या पथकाने छापा टाकत जुगार खेळत असलेले आकाश यशवंत सापधरे, व्यंकटेश राजेंद्र बाराहाते, महेंद्र विठोबा कोळी, विठ्ठल नागोराव मेहत्रे, नीलेश कालीदास पाटील , विजय शामराव गोसावी, अशोक हरचंद सोनवणे, संदीप शिंदे, धर्मेद्र सापधरे, अतुल रघुनाथ लोंढे, वामन बोदडे, अतुल जावरे यांना रंगेहात पकडण्यात आले.

पो. कॉ. शब्बीर तडवी यांचे फिर्यादीवरुन पोलीसात बारा जुगारीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोख रक्कम, चार दुचाकी, सात मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकुण १ लाख ३६ हजार ९४० रुपयाचा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलीस आसीम तडवी करीत आहे.

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या