Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»जिल्ह्याभरात पोलिसांचे ‘ऑपरेशन स्क्रॅप’!
    गुन्हे वार्ता

    जिल्ह्याभरात पोलिसांचे ‘ऑपरेशन स्क्रॅप’!

    भंगार दुकानांवर एकाच वेळी छापे : चोरीचा माल खपवणाऱ्या साखळीवर प्रहार
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 6, 2026No Comments307 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव जिल्ह्यामध्ये वाढत्या चोऱ्या आणि घरफोडीच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार आज सायंकाळपासून संपूर्ण जिल्ह्यात भंगार दुकान तपासणी ही धडाकेबाज मोहीम राबवण्यात येत आहे. चोरीचा माल विकण्याचे मुख्य केंद्र असलेल्या भंगार बाजारावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.

    गुन्हेगारी विश्वाचा अभ्यास केला असता पोलिसांना असे लक्षात आले आहे की, घरफोडी, वाहन चोरी किंवा रेल्वेचे रूळ आणि विजेच्या तारांची चोरी करणारा माल थेट भंगार दुकानात खपवला जातो. अनेकदा महागड्या गाड्या चोरून त्यांचे सुटे भाग या दुकानांमध्ये केले जातात. हीच साखळी मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व प्रमुख भंगार दुकानांची झाडाझडती सुरू केली आहे.

    संशयास्पद गाड्यांचे इंजिन, सुटे भाग आणि कागदपत्रे नसलेली वाहने, शेतकऱ्यांच्या विहिरींवरील मोटारी, केबल आणि लोखंडी अवजारांची तपासणी, रेल्वेचे साहित्य आणि विजेच्या तारांचा साठा तपासण्यात आला. भंगार दुकानदारांना कोणताही माल विकत घेताना तो कोणाकडून घेतला, याची नोंद ठेवणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक दुकानदार स्वस्त दरात चोरीचा माल विकत घेऊन पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकतात.

    आजच्या या मोहिमेमध्ये ज्या दुकानदारांकडे संशयास्पद माल आढळेल किंवा नोंदी नसतील, त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करण्याचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. या मोहिमेमुळे चोरीच्या साखळीतील महत्त्वाचा दुवा निखळण्याची शक्यता असून, सायंकाळपासून सुरू असलेल्या या कारवाईने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif