Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    • गणेश चतुर्थीच्या दिवशी हृदय पिळवटणारी घटना!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मतदानावेळी पोलिसांचा आंदोलकांवर गोळीबार
    गुन्हे वार्ता

    मतदानावेळी पोलिसांचा आंदोलकांवर गोळीबार

    9 जणांचा मृत्यू : मतदान केंद्रावर तणावाची परिस्थिती
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 28, 2026No Comments367 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    पाकिस्तानातील ताब्यातील काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या वेळी हिंसाचार आणि गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. तर बहुतेक मतदान केंद्रावर तणावाची परिस्थिती पाहायला मिळाली. काही ठिकाणी बॅलेट बॉक्स देखील जाळण्यात आल्या आहेत. या घटनांमुळे निवडणूक प्रक्रिया प्रश्न चिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. एका राजकीय कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचंही सांगण्यात येत आहे. तर मीडिया रिपोर्टनुसार, पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केल्याचंही समोर आलं आहे. या गोळीबारात 9 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आलं आहे.

    मीडिया रिपोर्टनुसार, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात मीरपूर विभागाच्या 13 मतदारसंघात मतदान पार पडले. मतदान सकाळीच सुरू झालं. परंतु दिवसाअखेर अनेक हिसांचाराच्या घटना घडल्या. कोटली जिल्ह्यात दोन विरोधी राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये गोळीबार झाला. या गोळीबारात पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली.

    मिळालेल्या माहितीनुसार, भिंबर आणि कोटलीसहित अनेक भागात बॅलेट बॉक्स जाळण्यात आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या व्यतिरिक्त मतदान प्रक्रियेत अडथळा आणल्याचाही आरोप करण्यात आला. तर काही परिस्थिती बिघडल्यानंतर मतदान काही वेळासाठी थांबवण्यात आलं. मतदानादरम्यान प्रमुख राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले. मतदारांना धमका वल्याचाही आरोप करण्यात आला. पीपीपी नेत्यांनी निवडणूक आयोगाला हिंसाचार आणि सुरक्षा व्यवस्थेवरून अनेक सवाल उपस्थित केले आहेत. तर इतर राजकीय पक्षांनीही मतदानवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्थानिक नागरिकांच्या संघटनेनेही मतदान प्रक्रियेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

    कोटली जिल्ह्यात हिंसाचाराची देखील घटना घडली आहे. पाकिस्तान पीपल्स पार्टीने म्हटलं की, हिसांचारात पक्षाचा कार्यकर्ता मुख्तार यूनूसचा मृत्यू झाला. पक्षाने या हत्येला राजकीय विरोधकांना जबाबदार ठरवलं आहे. तर विरोधी पक्षांनी आरोप फेटाळून लावले आहेत. या व्यतिरिक्त पाकिस्तान पीपल्स पार्टीने या संबंधी निवडणूक आयोगालाही तक्रार दिला आहे. तसेच त्यांनी मीरपूरमध्ये शस्त्रधारी लोकांनी मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप केल्याचाही आरोप केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल

    September 16, 2026

    गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!

    September 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif