Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    राजकारण

    मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस

    मुंबईच्या वाटेवर असतानाच पाठवली नोटीस
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 16, 2026No Comments308 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 19 वा दिवस आहे, मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेनं निघाले आहेत. त्यांनी 15 सप्टेंबर रोजी अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेनं प्रस्थान केलं आहे. मंगळवारी त्यांचा मुक्काम बीड जिल्ह्यातल्या पाटोदा येथे होता. आज त्यांचा मुक्काम श्रीगोंदा येथे असणार आहे. मात्र मुंबईच्या वाटेवर असतानाच आता पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना नोटीस पाठवली आहे. जरांगे पाटलांच्या वतीने उपोषणासाठी देण्यात आलेल्या तिसऱ्या अर्जानंतर मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना अधिकृत नोटीस बजावून आंदोलनाबाबतची सविस्तर माहिती तात्काळ सादर करण्यास कळवले आहे.

    मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर  उपोषण करण्याची घोषणा केली होती. त्या पार्श्वभूमीवर उपोषणाला परवानगी मिळवण्यासाठी त्यांनी आझाद मैदान पोलिसांकडे अर्ज केला होता. परंतु त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाच्या परवानगीसाठी अर्ज केला मात्र दुसऱ्यांदा देखील पोलिसांनी त्यांच्या उपोषणाला परवानगी नाकारली, दरम्यान त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्यांना अर्ज केला. जरांगे पाटलांच्या वतीने  उपोषणासाठी देण्यात आलेल्या तिसऱ्या अर्जानंतर आता मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना अधिकृत नोटीस बजावून आंदोलनाबाबतची सविस्तर माहिती तात्काळ सादर करण्यास कळवले आहे.

    आंदोलनात सहभागी होणाऱ्या व्यक्तींची संख्या, वाहनांचा तपशील आणि स्वयंसेवकांची यादी कार्यालयाला देण्यास सांगण्यात आले आहे.  माध्यमांसमोर केलेल्या “परवानगी नाकारली तर कोट्यवधी मराठे मुंबईत येणार” या वक्तव्यातील विरोधाभासावर पोलिसांनी या नोटीसच्या माध्यमातून स्पष्टीकरण मागितले आहे. परवानगी दिल्यानंतर आणखी आंदोलक मुंबईत येणार की कसे हे स्पष्ट करा, असं या नोटीसमध्ये पोलिसांनी म्हटलं आहे.

    दरम्यान मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता खालावली आहे, त्यांनी आज दुपारी एक वाजता तातडीची पत्रकार परिषद बोलावली आहे. ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे वैद्यकीय पथकाकडून त्यांना उपचार घेण्याची विनंती करण्यात येत आहे. परंतु त्यांनी उपाचर घेण्यास नकार दिला आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif