Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»कथित कुंटणखान्यावर पोलिसांची धडक कारवाई
    गुन्हे वार्ता

    कथित कुंटणखान्यावर पोलिसांची धडक कारवाई

    दोन पीडित महिलांची सुटका : संशयितांना घेतले ताब्यात
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 24, 2026No Comments876 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव शहरातील निमखेडी रस्त्यावरील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेल्या कथित कुंटणखान्यावर तालुका पोलिसांनी धडक कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, संबंधित संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निमखेडी रस्त्यावरील ब्रह्मांडनायक अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती तालुका पोलिसांना मिळाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध पद्धतीने संबंधित फ्लॅटवर छापा टाकला.

    या कारवाईदरम्यान फ्लॅटमधून दोन महिलांची सुटका करण्यात आली. तपासात सागर गुलाब सोनवणे (वय २७, रा. चोरगाव, ता. धरणगाव) व एका महिलेने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले.

    पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपासही सुरू करण्यात आला आहे. तालुका पोलीस पुढील तपास करीत आहेत.

    #crime #raid apartment Dharangaon jalgaon Kuntankhana Nimkhedi Taluka Police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif