जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचत आयुष्य संपवले. चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथील राहत्या घरामध्ये त्यांनी गळफास घेतला. निलेश पाटील असे आत्महत्या केलेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांच्या आत्महत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
प्राप्त माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले निलेश पाटील हे कोदगावातील राहत्या घरामध्ये गळाफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. निलेश पाटील यांचा मृतदेह पाहून त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. निलेश पाटील यांचे चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. पोलिसांना निलेश पाटील यांच्या घरामध्ये सुसाईड नोट मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली? यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

