अ‍ॅपेरिक्षा पलटल्याने एक ठार : चार जण जखमी

0

एरंडोल :- अ‍ॅपेरिक्षाच्या पुढील चाकाखाली डुक्कर आल्यामुळे रिक्षा पलटी होऊन एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाला असून अन्य चार जण जखमी झाल्याची घटना आज सकाळी म्हसावद रोडवरील सरस्वती कॉलनीजवळ घडली.

याबाबत सविस्तर असे की, अ‍ॅपेरिक्षा( क्र.एमएच १९ वी १२६७) ही चार प्रवसी घेऊन एरंडोल हून म्हसावदकडे जात असतांनाच सरस्वती कॉलनीजवळ अचानक डुक्कर अ‍ॅपेरिक्षाच्या चाकाखाली आल्यामुळे रिक्षा पलटी झाली. या अपघातामध्ये बाबुराव पाटील (६५) हे जागीच ठार झाले तर अन्य तीन जण जखमी झाले. या अपघातातील जखमींना एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घातानेबाबताचा गुन्हा एरंडोल पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला असून पुढील तपास एएसआय अशोक मोरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.