जळगाव जिल्ह्यातील १० पोलिस स्टेशनचे होणार विभाजन

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील १० पोलिस स्टेशनचे विभाजन करण्यात येऊन १० नवीन पोलीस स्टेशन, दूरक्षेत्र होणार आहे.  याबाबत सोमवारी १३ मार्च रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयात बैठक घेण्यात येणार आहे.

जळगाव जिल्ह्यातील बऱ्याच पोलिस ठाण्यांवर कामाचा भार वाढला आहे. त्यामुळे त्यांचे विभाजन करण्यात यावे, अशी मागणी होती. या अनुषंगाने जिल्ह्यातील १० पोलिस ठाण्यांचे विभाजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. आली आहे. यात अमळनेर पोलिस स्टेशनचे विभाजन करून शहर आणि ग्रामीण असे दोन पोलिस स्टेशन होतील.

जळगाव एमआयडीसी स्टेशनचे विभाजन होणार असून म्हसावद येथे नवीन पोलिस स्टेशन , जळगाव शहर पोलिस स्टेशनचे विभाजन होऊन शिवाजी नगरसाठी स्वतंत्र पोलिस स्टेशन निर्मिती होईल. पाचोरा स्टेशनचे विभाजन होऊन नगरदेवळा येथे नवीन स्टेशन होणार आहे. तर पारोळ्याचे विभाजन होऊन तामसवाडी येथे, मुक्ताईनगर पोलिस स्टेशनचे कुऱ्हा – काकोडा, पहूर स्टेशनचे शेंदुर्णी येथे, भडगाव स्टेशनचे कजगाव येथे पोलिस दूरक्षेत्र बनणार आहे. निंभोऱ्याचे विभाजन होऊन ऐनपूर येथे तर मेहुणबाऱ्याचे विभाजन होऊन पिलखोड येथे पोलिस दूरक्षेत्र होणार आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.