अरे वा.. बेरोजगार तरुणांना मिळणार कर्ज आणि अनुदान; वाचा सविस्तर

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

केंद्र सरकारने देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधान रोजगार सृजन ही नवी योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी आर्थिक मदत केली जाणार आहे.

तसेच वन, खनिज, खाद्य, कृषी, अभियांत्रिकी, रसायन आणि वस्त्रोद्योगाशी संबंधित व्यवसाय सुरु करणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे.

किती अनुदान मिळणार?

या योजनेतंर्गत ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरु करण्यासाठी 25 टक्के अनुदान मिळेल, तर शहरी भागातील तरुणांना 15 टक्के अनुदान मिळेल.

कसा मिळेल योजनेचा लाभ ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंतप्रधान रोजगारनिर्मिती योजनेच्या PMEGP संकेतस्थळावर जा. त्यांनतर PMEGP हा पर्याय निवडा. त्यानंतर PMEGP E -Portal हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करुन Online Application Form of Individual मिळवता येईल या अर्जात आपली सर्व माहिती भरा आणि सबमिट करा.

Leave A Reply

Your email address will not be published.