Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ब्रेकिंग»ऑपरेशन सिंदूर म्हणजे न्यायाची अखंड प्रतिज्ञा
    ब्रेकिंग

    ऑपरेशन सिंदूर म्हणजे न्यायाची अखंड प्रतिज्ञा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 12, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली, लोकशाही न्युज नेटवर्क 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तान तणावावर भाष्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांचा हल्ल्याचा निषेध केला. पाकिस्तानविरोधात दाखवलेल्या वीरतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैनिकांची पाठ थोपटली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरवर भाष्य केलं. यावेळी पाकिस्तानच्या भूमिकेवरही टीका केली.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ८ वाजता देशवासीयांना संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘मी सैन्याच्या शौर्याला, धाडसाला, पराक्रमाला आज समर्पित करतोय. देशाच्या माता भगिनी आणि मुलींना हे पराक्रम समर्पित करतो. २२ एप्रिल पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी जो हल्ला केला होता, त्याने देश आणि जगाला हादरा बसला’.

    ‘पर्यटकांना धर्म विचारून त्यांच्या कुटुंबीयांसमोर मुलांसमोर निर्दयीपणे मारलं. हे दहशतवादाचं बिभत्स चेहरा होता. क्रूरता होती. हा देशाच्या सद्भावनेला तोडण्याचा प्रयत्न केला. माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या हे दुःख खूप मोठं होतं. या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश, प्रत्येक नागरीक, समाज, प्रत्येक वर्ग, पक्ष एका स्वरात दहशतवादाविरोधात कठोर कारवाईसाठी एकत्र आला. उभा राहिला, असे ते म्हणाले.

    ‘आम्ही दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी भारतीय सैन्याला संपूर्ण सूट दिली. आणि आज प्रत्येक दहशतवादी, प्रत्येक संघटना समजले की आमच्या बहिणी आणि मुलींचे कुंकू पुसण्याची किती मोठी किंमत मोजावी लागली. ऑपरेशन सिंदूर फक्त नाव नाही. हे देशाच्या कोटी नागरिकांच्या भावनांचं प्रतिबिंब आहे. ऑपरेशन सिंदूर न्यायाची अखंड प्रतिज्ञा आहे.

    ‘६ मे च्या मध्यरात्री , ७ मे च्या सकाळी संपूर्ण जगाने या प्रतिज्ञेला परिणामात बदलताना बघितलं. भारतीय सेनेने पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर त्यांच्या ट्रेनिंग कॅम्पवर नेमका प्रहार केला. दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नव्हता की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकतो. पण देश एकजूट होतो तेव्हा, राष्ट्र प्रथम या भावनेने भारलेला असतो तेव्हा पौलादी निर्णय घेतले जातात, असे ते पुढे म्हणाले.

    गेल्या अडीच ते तीन दशकांपासून पाकिस्तानात दहशतवादाचे आका खुलेआम फिरायचे. हे आका भारताविरोधात षड्यंत्र करायचे. याच आकांना भारताने एका झटक्यात समाप्त करून टाकलं. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तान घोर निराशेत गेला. पाकिस्तान हताश झाला होता. याच निराशेत पाकिस्तानने आणखी एक धाडस केलं. दहशतवादाला नष्ट करण्यासाठी भारताच्या कारवाईला साथ देण्याऐवजी पाकिस्ताने भारतावरच हल्ला करणं चालू केलं. पाकिस्तानने शाळा, कॉलेज, गुरुद्वारा, मंदीर, सामान्य नागरिकांच्या घरांना लक्ष्य केलं. पाकिस्तानने आमच्या लष्करी तळांना लक्ष्य केलं. पण यातही पाकिस्तानचा बुरखा फाटला,असं नरेंद्र मोदी म्हणाले.

     

    भारतीय सैनिकांचे केले कौतुक 

    ‘आपण सर्वांनी गेल्या काही दिवसात देशाचं सामर्थ्य आणि संयम पाहिलं आहे. मी सर्वात आधी भारताच्या पराक्रमी सेना आणि सशस्त्र दल, आपल्या गुप्तचर एजन्सी, संशोधक प्रत्येक भारतवासियांकडून सॅल्यूट करतो. आपल्या वीर सैनिकांनी ऑपरेशन सिंदूरच्या लक्ष्याच्या प्राप्तीसाठी असिम शौर्य दाखवलं. मी त्यांच्या शौर्य, साहस, पराक्रमाला आज समर्पित करत आहे.’, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच देशाला संबोधित केलं. आपल्या देशाच्या मातांना, बहिणींना आणि देशाच्या प्रत्येक मुलीला हा पराक्रम समर्पित करत असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

     

     

    पाकिस्तानला सूचक इशारा 

    पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय, यापुढे पाकिस्तान काय भूमिका घेतो, हे पाहणार, असा सूचक इशारा दिला. पाकिस्तानकडून जेव्हा सांगितलं गेलं की त्यांच्याकडून पुढे कोणतीही दहशतवादी कारवाई केली जाणार नाही. सैन्य गोळीबार होणार नाही. त्यावर भारताने विचार केला. आम्ही पाकिस्तानचे दहशतवादी आणि सैन्य ठिकाण्यावर प्रत्युत्तर म्हणून आता फक्त स्थगित केलं आहे. येत्या काळात आम्ही पाकिस्तान काय भूमिका घेतो कसा वागतो हे पाहणार आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

     

    तीन दिवसांत पाकिस्तान उद्धवस्त

    जगाने पाहिलं की पाकिस्तानचे ड्रोन्स, पाकिस्तानच्या मिसाईल्स अयशस्वी ठरल्या. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने या हल्ल्यांना आकाशातच नष्ट केलं. पाकिस्तानची तयारी ही सीमेवर हल्ला करण्याची होती. पण भारताने पाकिस्तानच्या छातीवर वार केला. भारताचे ड्रोन्स, भारताच्या मिसाईल्सने ठरवलेल्या लक्ष्यांवर बरोबर हल्ले केले. भारतीय लष्कराने पाकिस्ताच्या हवाई तळांना नेस्तनाबूत केलं. भारताने पहिल्या तीन दिवसांत पाकिस्तानला उद्धवस्त केलं. त्यामुळे भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करत होता. पूर्णपणे मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानने 10 मेच्या दुपारी पाकिस्तानी सेनाने आपल्या डीजीओमओंना संपर्क केला, अशी ही माहिती मोदी यांनी दिली.

    pm narendra modi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अनिल चौधरींसह तिघे शिवसेनेत दाखल

    September 3, 2026

    बिअर बारमध्ये देशी दारू विक्रीचा व्हिडिओ काढला!

    August 28, 2026

    जळगावहून हैदराबादपर्यंत आरोग्यसेवेचा नवा ‌‘पूल‌’!

    August 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif