Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राष्ट्रीय».. मुस्लिम व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष बनवा
    राष्ट्रीय

    .. मुस्लिम व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्ष बनवा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 14, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

     

     

     

     

    नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

     

    हरियाणाच्या हिस्सारमध्ये मोदींनी काँग्रेसला मोठे आव्हान केले आहे. काँग्रेसला मुस्लिमांचा एवढाच कळवळा असेल तर त्यांनी मुस्लिम व्यक्तीला आपल्या पक्षाचा राष्ट्रीय अद्यक्ष बनवावं. संसदेत मुस्लिमांना 50 टक्के तिकीट द्यावं. ते जिंकून आले तर त्यांचं म्हणणं मांडतील. पण काँग्रेसला तसं करायचंच नाहीये. कुणाचंही भलं करावं हे कधीच काँग्रेसला वाटलं नव्हतं. मुस्लिमांचं भलं करावं असंही त्यांना कधी वाटलं नाही. हेच काँग्रेसचं खरं वास्तव आहे. काँग्रेसच्या लांगुलचालनाच्या राजकारणाने मुस्लिमांना काडीचाही फायदा झाला नाही. उलट त्यांचं नुकसान झालं. काँग्रेसने केवळ काही कट्टरपंथियांना खुश करण्याचा पर्याय निवडला. इतर समाज हालअपेष्टेत राहिला. अशिक्षित राहिला. गरीब राहिला, असं सांगतानाच काँग्रेसच्या कुनितीचं सर्वात मोठं उदाहरण वक्फ कायदा आहे. नव्या तरतुदींमुळे वक्फच्या पवित्र भावनेचा सन्मान होणार आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.

     

    वक्फच्या नावावर लाखो हेक्टर जमीन आहे. वक्फच्या मालमत्तेचा लाभ गरजवंतांना दिला असता तर त्यांना फायदा झाला असता. पण या मालमत्तेचा फायदा भू-माफियांना मिळाला. आता या नव्या दुरुस्ती विधेयकामुळे गरीबांची लूट बंद होणार आहे. आता नव्या वक्फ कायद्यामुळे देशातील कानाकोपऱ्याती आदिवासींच्या कोणत्याही जमिनीला ते हात लावू शकणार नाहीत. नव्या तरतुदींमुळे मुस्लिम समाजातील गरीब आणि पसमांदा कुटुंब, महिला आणि खासकरून मुस्लिम विधवा, मुलांना हक्क मिळेल. त्यांचे हक्क सुरक्षित राहतील. हाच खरा न्याय आहे, असं ते म्हणाले.

     

    बाबासाहेबांनी सामाजिक न्यायाचं स्वप्न पाहिलं होतं. संविधानात त्यांनी सामाजिक न्यायाची व्यवस्था केली होती. त्यातही खंजीर खुपसून काँग्रेसने संविधानाच्या या तरतुदींना लांगूलचालणाचं माध्यम बनवलं. सत्ता हस्तगत करण्याचं एक हत्यार म्हणून काँग्रेसने संविधानाचा वापर केला. जेव्हा जेव्हा काँग्रेसला सत्तेचं संकट दिसलं तेव्हा तेव्हा त्यांनी संविधान पायदळी तुडवलं. काँग्रेसने आणीबाणीच्या काळात संविधानाच्या आत्म्याला नख लावलं. आपल्याच हाती सत्ता राहावी म्हणून त्यांनी हे केलं. काँग्रेसने बाबासाहेबांना सतत अपमानित केलं. त्यांचे विचार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला.

     

    pm narendra modi
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

    May 18, 2026

    भाजप कार्यालय फोडलं : १५-२० हल्लेखोरांचा हल्ला!

    May 12, 2026

    ७१७ सरकारी दारूची दुकाने तातडीने बंद करा!

    May 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif