“विकास जीता, सुशासन जीता”

दिल्ली निकालावर पंतप्रधान मोदी काय म्हणाले ?

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुका पार पडल्या. भाजप आणि आपमध्ये काटे की टक्कर असताना भाजपचा मोठा विजय झाला आहे. नवी दिल्लीत भाजपने तब्बल 47 जागांवर मुसंडी मारली आहे. तर आम आदमी पक्षाला केवळ 23 जागांवर समाधान मानावे लागले तर काँग्रेसला एका जागेवर सुद्धा यश मिळवता आले नाही.  त्यामुळे तब्बल 27 वर्षानंतर नवी दिल्लीत भाजपचे कमळ फुलले आहे. या निकालानंतर दिल्लीत भाजपची एकहाती सत्ता येणार असल्याचे निश्चित झाले आहे. दिल्लीत भाजपला बहुमत मिळाल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

https://x.com/narendramodi/status/1888150404288098674

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकतंच त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी आता आम्ही आणखी जोमाने दिल्लीतील लोकांची सेवा करु, असे आश्वासन संपूर्ण दिल्लीतील जनतेला दिले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ?

“जनशक्ती सर्वेपरि! विकासाचा विजय झाला. सुशासन जिंकले. दिल्लीतील सगळ्या भावा-बहिणींनी आम्हाला ऐतिहासिक विजय मिळवून दिला, त्यासाठी मी त्यांचे वंदन करतो आणि अभिनंदनही. तुम्ही आम्हाला जो आशीर्वाद आणि प्रेम दिले आहे, त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानतो. आम्ही दिल्लीचा चौफेर विकास करु. तसेच दिल्लीतील लोकांचे जीवन उत्तम बनवण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. ही आमची गॅरेंटी आहे. यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीत दिल्लीची भूमिका महत्त्वाची असेल, असे आम्ही आश्वस्त करतो. मला भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांवर गर्व आहे. त्यांनी या विजयासाठी दिवस रात्र मेहनत केली. आता आम्ही आणखी जोमाने आणि मजबुतीने दिल्लीतील लोकांची सेवा करु”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.