Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राष्ट्रीय»पंतप्रधान मोदींची आसाममधील चहाच्या मळ्याला भेट
    राष्ट्रीय

    पंतप्रधान मोदींची आसाममधील चहाच्या मळ्याला भेट

    महिलांसोबत चहाची पाने तोडत काढला सेल्फी
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 1, 2026No Comments232 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

     लोकशाही न्यूज नेटवर्क

    आसाममधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामला पोहोचले आहेत. आज प्रचारासाठी रवाना पंतप्रधानांनी दिवसाची सुरुवात एका चहाच्या बागेला भेट देऊन केली. या वेळी त्यांनी चहाच्या बागेत काम करणाऱ्या महिला कामगारांसोबत चहाची पाने तोडली, त्यांच्याशी संवाद साधला, सेल्फी काढला आणि आसामच्या चहाच्या जागतिक महत्त्वावर प्रकाश टाकला.

    पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर चहाच्या मळ्याला दिलेल्या भेटीचा अनुभव शेअर करताना चहाला आसामचा आत्मा असे म्हटले. राज्याच्या चहाने जगभरात एक वेगळी आणि खास ओळख निर्माण केली आहे. हा दौरा स्मरणीय अनुभव असल्याचे सांगत पंतप्रधानांनी कामगारांशी संवाद साधला. हे कामगार चहा उद्योगाचा कणा मानले जातात. पंतप्रधानांनी त्यांच्या योगदानाचे कौतुकही केले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये म्हटले की, ‘चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या प्रत्येक कुटुंबाच्या प्रयत्नांचा आम्हाला खूप अभिमान आहे. त्यांची मेहनत आणि समर्पणामुळे आसामचा गौरव वाढला आहे. या भेटीतील अनेक छायाचित्रे शेअर करत पंतप्रधानांनी लिहिले की, ‘चहाची पाने तोडल्यानंतर महिलांनी त्यांच्या संस्कृतीबद्दल सांगितले आणि मग आम्ही एकत्र सेल्फीही घेतल्या.”

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चहा बागेतील कामगारांसोबतची ही संवाद साधण्याची घटना त्यांच्या चहाशी असलेल्या जुन्या वैयक्तिक नात्यालाही अधोरेखित करते. पंतप्रधान मोदी अनेकदा बोलताना म्हटले आहे की, संघर्षाच्या काळात त्यांनी गुजरातमधील एका रेल्वे स्थानकावर वडिलांसोबत चहा विकलेला आहे. या संघर्षातून पुढे जात ते देशाचे पंतप्रधान बनले. ही अनेकांसाठी एक प्रेरणादायी बाब आहे.

    आसाम हे जगातील सर्वात मोठ्या चहा उत्पादक राज्यांपैकी एक आहे. भारताच्या चहा निर्यातीत आसामची महत्त्वाची भूमिका आहे. या उद्योगात लाखो लोकांना रोजगार मिळतो. डिब्रूगढ, तिनसुकिया आणि जोरहाट या जिल्ह्यांतील चहा बागांमध्ये महिला कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पंतप्रधान मोदी यांनी चहा बागेला भेट देणे आणि तेथील महिला कामगारांशी संवाद साधणे हे प्रतीकात्मक आणि रणनीतिक अशा दोन्ही दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जात आहे. या भेटीद्वारे आसामच्या सामाजिक-आर्थिक आणि राजकीय परिस्थितीत चहा समुदायाचे महत्त्व अधोरेखित होते. तसेच, चहा उद्योगाशी संबंधित लाखो मतदारांवर याचा प्रभाव पडू शकतो, त्यामुळे पंतप्रधानांची ही भेट खास मानली जात आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान

    November 8, 2026

    अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ

    November 8, 2026

    हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif