लोकशाही न्यूज नेटवर्क
पहलगाव दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी आणि दहशतवाद्यांचा कट रचणाऱ्यांना भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ द्वारे धडा शिकवला. पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांची 9 तळ नष्ट केली. ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला शिकवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी थेट जवानांना जाऊन भेटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमधील आदमपूर एअरबेसवर पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी जवानांसोबत संवाद साधला.
शूर सैनिकांशी साधला संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी आदमपूर एअरबेसवर पोहोचले. त्यांनी हवाई दलातील शूर सैनिकांशीही संवाद साधला. यावेळी हवाई दलाच्या जवानांनी सद्यस्थितीची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली. या दौऱ्याचे अनेक फोटो समोर आले आहेत. एका छायाचित्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे एक भारतीय लढाऊ विमान दिसत आहे. त्यावर लिहिले आहे की, शत्रूचे पायलट नीट झोपू शकले नाहीत?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूर एअरबेसवर जाऊन पाकिस्तानसह संपूर्ण जगाला एक संदेश दिला. संपूर्ण देश सैनिकांसोबत आहे. जो कोणी भारताकडे डोळे वर करून पाहण्याची हिंमत केली तर त्याला धूळ चारली जाईल.