ट्रम्प-मोदींची भेट ठरणार खास !

अमेरिकावारीची तारीख ठरली : पंतप्रधान करणार ‘मन की बात’

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दि. 12 फेब्रुवारीपासून दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान ते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करणार आहेत. या संबंधी सूत्रांनी दिलेल्या माहितीवरुन, योजनेनुसार पंतप्रधान मोदी पॅरिसचा दोन दिवसांचा दौरा पूर्ण केल्यानंतर वॉशिंग्टन डीसीला जातील. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच द्विपक्षीय अमेरिका दौरा असेल. ट्रम्प प्रशासन दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर काही आठवड्यांतच वॉशिंग्टन डीसीला द्विपक्षीय भेट देणाऱ्या मोजक्या परदेशी नेत्यांमध्ये पंतप्रधान मोदी यांचाही समावेश असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी एआय परिषदेत सहभागी झाल्यानंतर दि.12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी फ्रान्सहून अमेरिकेत पोहोचण्याची अपेक्षा आहे. दि. 14 फेब्रुवारीपर्यंत अमेरिकेच्या राजधानीतच राहतील. या दरम्यान, पंतप्रधान मोदी दि. 13 फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची भेट घेण्याची शक्यता आहे. ट्रम्प मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींसाठी रात्रीचे जेवण देखील आयोजित करू शकतात. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या फोन कॉलनंतर सांगितले होते की, पंतप्रधान मोदी फेब्रुवारीमध्ये व्हाईट हाऊसला भेट देऊ शकतात.

कॅनडा, मेक्सिको आणि चीनवर ट्रम्प यांनी कर लादल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील होणारी चर्चा आणखी खास बनली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ट्रम्प भारतासोबतची व्यापार तूट कमी करण्यासाठी कटिबद्ध आहेत. या कार्यकाळात, ट्रम्प भारतीय बाजारपेठेत अधिक भक्कमपणे काम करण्याची योजना आखत आहेत. पंतप्रधान दि. 12 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी अमेरिकेच्या राजधानीत पोहोचतील. आणि दुसऱ्या दिवशी मोदी आणि ट्रम्प यांच्यात चर्चा होण्याची अपेक्षा आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.