Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    • देवझिरी-देवगडच्या जंगलात अवैध गांजाची १७५ झाडे जप्त
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी
    जळगाव

    ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी

    राखीव वनक्षेत्रात गांधी रिसर्च फाउंडेशन व वन विभाग यांच्या संयुक्त उपक्रम
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 12, 2026No Comments43 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत जिल्हाधिकारी, जळगाव यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत गांधी रिसर्च फाउंडेशन, आणि जळगाव वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अनुभूती निवासी स्कुलच्या पाठीमागील राखीव वनातील कक्ष क्रमांक ४०७ येथे वृक्षारोपण व सीड्स बॉल लागवड कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विविध प्रजातींच्या ५०० रोपांची लागवड करण्यात आली. तसेच करंज, कांचन आदी वृक्षप्रजातींच्या ३ हजार सीड्स बॉलची पेरणी करण्यात आली. वनक्षेत्रातील जैवविविधता वाढविणे, स्थानिक वृक्षप्रजातींचे संवर्धन करणे आणि पर्यावरण संरक्षणाला चालना देणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.

    कार्यक्रमास जैन इरिगेशन च्या गार्डन व कृषी विभागाचे प्रमुख अजय काळे, संजय सोनजे, पर्सोनल विभागाचे राजेश आगीवाल, जैन इरिगेशनच्या वन व पर्यावरण विभागाचे राजेंद्र राणे, सहाय्यक वनसंरक्षक अमोल चव्हाण व अमोल पंडित, वनपरिक्षेत्र अधिकारी रामकृष्ण लामगे, क्षेत्रीय अधिकारी उमाकांत कोळी, हरिष थोरात, स्वप्निल गोसावी व संभाजी पाटील उपस्थित होते.

    गांधी रिसर्च फाउंडेशनचे फिल्ड ऑफिसर विक्रम अस्वार, डिव्हाईन गार्डन विभागाचे मयूर देशमुख, शुभम काळे, गोकुळ सपकाळे यांच्यासह चार स्थानिक महिला बचत गटांच्या सदस्या आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मान्यवर, महिला बचत गटांच्या सदस्या व ग्रामस्थांच्या सामूहिक सहभागातून वृक्षारोपण आणि सीड्स बॉल लागवडीचे काम यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या उपक्रमामुळे राखीव वनक्षेत्रातील जैवविविधता संवर्धनास हातभार लागणार असून, स्थानिक पातळीवर हरित महाराष्ट्र अभियानाला अधिक बळ मिळणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif