Sunday, November 27, 2022

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभे निम्मीताने नियोजन बैठक संपन्न…

- Advertisement -

 

- Advertisement -

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चिखली येथील सभेसाठी मलकापूर शहर व तालुका शिवसेनेची नियोजन बैठक दि.13 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती.

स्थानिक विश्रामगृहावर जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील,जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, विधानसभा संघटक राजेश सिंह राजपूत,तालुकाप्रमुख दिपक चांभारे पाटील, शहर प्रमुख गजानन ठोसर, युवासेना तालुकाप्रमुख गणेश सुशीर, युवासेना शहरप्रमुख पवन गरुड, कामगारसेना तालुकाप्रमुख राम थोरबोले, किसानसेना शहरप्रमुख सै. वसीम, शिवसेना उपशहरप्रमुख शकील जमादार, बाळू पोलाखरे, शेख समद कुरेशी तालुका व शहरातील सर्व पदाधिकारी शाखाप्रमुख, विभाग प्रमुख, उपतालुकाप्रमुख, शिवसैनिकांची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

या बैठकीत तालुका व शहरात जास्तीत जास्त शिवसैनिकांची सदस्य नोंदणी करून दि.26 नोव्हेंबर रोजी चिखली येथे होऊ घातलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभेला मोठ्या संख्येने चिखली येथे उपस्थित राहण्याचे आवाहन संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी केले.

यावेळी रामराव तळेकर, हरीदास गणबास, मंगेश पाटील, आशिष पाटील, संतोष घोडके, ज्ञानेश्वर पाटील, विजय झांबरे, मधुकर चित्रंग, सुभाष कवळे, विशाल फुकटे, पंडित इंगळे, विनोद कचरे, सुरेश वाघ, अक्षय गणतीरे, मयूर ताटर, अभिषेक भोंबे, शिवम ढोले, दुर्गेश सनीसे, भूषण ढोले, अभिषेक ढोले यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या