Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»संपादकीय»दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    संपादकीय

    दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 12, 2026Updated:October 13, 2026No Comments39 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    महाराष्ट्रात जवळजवळ 265 तालुके आणि अधिक 19 तालुक्यांमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर झाला. त्या दृष्टीने आता शेतकरी आणि शेतमजुरांना ज्या सुविधा द्यायच्या आहेत, त्याबाबत नियोजनाला सुरुवात झाली आहे. केंद्रीय दुष्काळ पाहणी दौऱ्यातील सदस्यांबरोबर त्यांच्या महाराष्ट्रातील दुष्काळ पाहणीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर चर्चा केली आणि त्या चर्चेतून मार्ग काढण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रयत्न केले. त्यात ऑगस्ट 2017 पर्यंत शेतकरी, शेतमजुरांना अन्नधान्य, गोधनासाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्याचा आराखडा करण्यात आला आहे. म्हणजे शेतकरी, शेतमजूर यांना अन्नधान्य कमी पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. अन्नधान्याशिवाय शेतकरी, शेतमजूर उपाशी राहणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल. शेतकऱ्यांकडील एकही पशुधनाची विक्री केली जाणार नाही, अशी त्यांच्या चाऱ्याची व्यवस्था करण्यात येईल. जळगाव जिल्ह्यातील चारा बाहेर कोठेही विक्री होणार नाही, याची काळजी आम्ही घेणार आहोत. त्यामुळे पशुधन शेतकऱ्यांना सांभाळणे अवघड जाणार नाही. तसेच एकही पशुधन या चाऱ्याअभावी उपाशी राहणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. पशुधनाच्या चाऱ्याबरोबर त्यांच्या पाण्याची व्यवस्थाही तितक्याच जोरदार पद्धतीने करण्यात येईल, जेणेकरून एकही पशुधन चारा आणि पिण्याच्या पाण्याअभावी राहणार नाही. अशी व्यवस्था करण्यात येणार आहे.

    धरणातील पाण्याचा साठा हा पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवला जाईल, असे सूक्ष्म नियोजन करण्यात येईल. ऑगस्ट 2017 पर्यंत पिण्याचे पाणी लोकांसाठी उपलब्ध राहील, अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. धरणातील पाण्याचा साठा हा शेतीसाठी बिलकुल दिला जाणार नाही. आधी जनतेला पिण्याचे पाणी मिळाले पाहिजे, याला प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच सूक्ष्म नियोजनही करण्यात येणार आहे. आज केंद्रीय दुष्काळ पाहणी दौऱ्यातील संयुक्त सचिव श्री. मुक्तानंद अस्वार यांच्याशी चर्चा करताना स्पष्ट भूमिका जाहीर केली. केंद्रीय दुष्काळ पाहणी दौऱ्यानंतर महाराष्ट्रात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याचा प्रस्ताव केंद्रीय पथकाद्वारे दिला जाणार आहे, यात काही शंका नाही. केंद्रीय पथकाने दुष्काळ जाहीर केल्यानंतर केंद्राकडून भरघोस मदत महाराष्ट्राला मिळणार आहे, यात शंका नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना केंद्राबरोबर राज्यातही आर्थिक मदत मिळेल. त्यामुळे राज्य आणि केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील दुष्काळी भागात भरपूर आर्थिक मदत मिळणार आहे. परतीच्या पावसाची अपेक्षा होती, पण तोही पडला नाही. अपेक्षा फोल ठरली. परतीच्या पावसानेही दगा दिला. त्यामुळे परतीच्या पावसावर शेतकऱ्यांची रब्बी हंगामाची आशा मावळली आहे. 1972 पेक्षाही भयंकर कोरडा दुष्काळ महाराष्ट्राच्या वाट्याला आलेला आहे किंवा 72 च्या दुष्काळाची आठवण करून देणारा हा दुष्काळ राहील, यात मात्र काही शंका नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी, शेतमजूर यांना कामे देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न चालू आहेत. हिवाळ्याची सुरुवात होत आहे, पण हिवाळ्याची चाहूल काही दिसत नाही. त्यांना हिवाळ्याऐवजी उन्हाळ्याचे आठ महिने राहतील, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा किती दिवस पुरेल, हे सांगता येत नाही. बाष्पीभवनामुळे पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात होऊन धरणे कोरडी पडतील. ती धरणे केव्हा कोरडी ठाक होतील, हे सांगता येत नाही. त्यामुळे सरकारने केलेले नियोजन कितपत यशस्वी होईल, हे देखील सांगता येणार नाही. सरकारच्या नियोजनावर पाणी फिरण्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे इंग्रजीत एक म्हण आहे की, मॅन प्रपोजेस आणि गॉड डिस्पोजेस, असा प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    यंदाचा कोरडा दुष्काळ दुर्लक्ष करण्याजोगा नाही. आतापासून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू झाले आहेत. टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. अशा किमान 100 गावांना आता टँकरने पाणी पुरवले जाते आहे. या गावांमध्ये तर भर उन्हाळ्यात काय अवस्था होईल, हे देखील सांगता येणार नाही. अनेक गावे ओसाड पडण्याची शक्यता आहे. आजच अकोला शहरात 15 दिवसांआड एकदा नळाला पाणीपुरवठा होतो आहे. दुष्काळात काय अवस्था होईल, याची कल्पनाच केलेली बरी. अकोल्याच्या काटेपूर्णा धरणावर केवळ पंधरा दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक आहे. ज्या काही शहरांत खाजगी विहिरी आणि खाजगी बोरवेल आहेत, त्या सध्या आटलेल्या आहेत. पाणीच नसल्यामुळे ट्यूबवेलदेखील अत्यंत कमी वेळ चालतात. त्यातील पाणी संपून जाते. तीच अवस्था खाजगी विहिरींचीही आहे. त्यातील पाणी आटत चालल्याने त्या कोरड्या पडत आहेत. त्यामुळे अकोला शहरासमोर पिण्याच्या पाण्याचा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. याचे परिणाम उन्हाळ्यात काय होतील? पिण्याच्या पाण्यासाठी आपसात भांडणे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    जळगाव शहराबाबत विचार केला, तर वाघूर धरणात एक वर्ष पुरेल एवढा साठा उपलब्ध आहे. त्यात त्याचे बाष्पीभवन कसे होईल, हे सांगता येत नाही. त्याचबरोबर हतनूर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्याचा पाणीसाठा पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येईल. त्याचबरोबर गिरणा धरण हे पूर्णपणे भरले असल्याने त्या पट्ट्यातील गावांना ते पाणी पिण्यासाठी वापरण्यास येऊ शकते. त्यामुळे जळगाव जिल्ह्याला सध्या तरी पिण्याच्या पाण्याची दाहकता नाही, पण ज्या गावांमध्ये टँकर चालू आहेत, त्या गावांची समस्या मात्र भीषण राहणार आहे, यात शंका नाही. महाराष्ट्रात इतरत्र पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होईल, अशी भीती आहे. त्यामुळे पाण्याची काटकसर आतापासूनच करणे गरजेचे आहे, हे लक्षात येईल. शेतकरी, शेतमजूर, रोजगार, त्यांना लागणारे अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ही फार मोठी गंभीर समस्या उद्भवणार आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिवाळी पाडवा आणि भाऊबीज : नात्यातील जिव्हाळ्याचा दीपोत्सव

    November 8, 2026

    दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!

    November 7, 2026

    जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif