Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    • प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»अपघात»बापरे..! व्हाइट हाऊसजवळ हॅलिकॉप्टर आणि विमानाची टक्कर
    अपघात

    बापरे..! व्हाइट हाऊसजवळ हॅलिकॉप्टर आणि विमानाची टक्कर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 30, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अमेरिकेत व्हाइट हाऊसजवळ मोठा विमान अपघात झाला आहे. व्हाइट हाऊस हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच निवासस्थान आहे. दुर्घटनेनंतर विमान पोटोमॅक नदीत कोसळलं. नदीतून आतापर्यंत 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या विमानात 60 प्रवासी होते. हेलिकॉप्टरला विमान धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. हे विमान वॉशिंग्टनच्या रोनाल्ड रिगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरणार होतं. अमेरिकेतील कंसास सिटी येथून हे विमान वॉशिंग्टनला चाललं होतं. कॅनडा एअरच हे विमान होतं. सध्या रोनाल्ड रिगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर सगळी उड्डाण आणि लँडिंग थांबवण्यात आली आहेत. विमान आणि हॅलिकॉप्टरचा ढिगारा पोटोमॅक नदीमध्ये आहे. मदत आणि बचाव कार्य सुरु आहे.

    हे विमान हेलिकॉप्टरला धडकल्याने हा भीषण अपघात झाला. हे अमेरिकन सैन्याच H-60 ब्लॅकहॉक हेलिकॉप्टर होतं. या दुर्घटनेनंतर रीगन इंटरनॅशनल एअरपोर्टवर इमर्जन्सी घोषित करुन विमानतळ बंद करण्यात आला. व्हाइट हाऊस ते एअरपोर्ट हवाई अंतर तीन किलोमीटरपेक्षा पण कमी आहे. हा अपघात झाला, त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसमध्ये उपस्थित होते. हा अपघात आहे की कारस्थान ते अजून समजू शकलेलं नाही. मिलिट्री हेलिकॉप्टर अचानक विमानाच्या समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पोटोमॅक नदी बर्फासारखी घट्ट झाली आहे. त्यामुळे लोकांच्या बचावण्याची शक्यता फार कमी आहे.

    विमानाच्या एअरपोर्टवरील लँडिंगआधी ही घटना घडली. मिलिट्री हॅलिकॉप्टर आणि विमानाची टक्कर या बद्दल लोक अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. अचानक मिलिट्री हेलिकॉप्टर तिथे कसं आलं? मिलिट्री हेलिकॉप्टरमध्ये कोण होतं? संघीय उड्डयन प्रशासनाने आणि राष्ट्रीय परिवहन सुरक्षा बोर्ड रोनाल्ड रीगन राष्ट्रीय विमानतळाजवळ झालेल्या या अपघाताची चौकशी करणार आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    airplane Canada Crash Helicopter Potomac River USA washington White House
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    प्रेमसंबंधाचा विरोध ठरला जीवघेणा!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif