आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क;
अमेरिकेतील फ्रँकलिन येथे एका विमानाला अपघात झाला. यामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. हे विमान बुधवारी विल्यमसन काउंटीमध्ये क्रॅश झाल्याचे सांगण्यात येत आहे. हे एक छोटे विमान होते, ज्याच्या अपघातात तीन लोकांचा मृत्यू झाला. स्थानिक अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला. विल्यमसन काउंटीचे प्रमुख डेप्युटी मार्क एलरॉड यांनी पत्रकारांना सांगितले की, विमानाने बॅटन रूज, लुईझियाना येथून उड्डाण केले होते आणि ते केंटकीच्या लुईसविले येथे जात होते.
स्थानिक वेळेनुसार दुपारच्या सुमारास नॅशव्हिलच्या दक्षिणेस ४८.२८ किलोमीटर अंतरावर टेनेसी येथे विमान क्रॅश झाल्याचे त्यांनी सांगितले. एलरॉड यांनी सांगितले की, विमानाचे अवशेष एक मैलांपेक्षा जास्त परिसरात पसरले होते. यावरून अपघातात किती जीवितहानी झाली याचा अंदाज बांधता येतो. मात्र, सुदैवाने विमान अपघातामुळे कोणत्याही इमारतीचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. या घटनेत ठार झालेल्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नाहीत. विल्यमसन काउंटी इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीच्या प्रवक्त्या जिल बर्गिन यांनी सांगितले की त्यांना रात्री 12:05 च्या सुमारास कॉल आला.
फोन करणाऱ्याने फोन करून अपघाताची माहिती दिली.
“कॉलरने फक्त विमान अपघाताची भीती व्यक्त केली आणि त्याच्याकडे जास्त तपशील नव्हते. त्यांनी फक्त एक आवाज ऐकला आणि मलबा दिसला. हीच सर्व माहिती त्यांनी प्रदान केली,” बर्गिन यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. फेडरल एव्हिएशन असोसिएशन (FAA) ने विमानाची ओळख सिंगल-इंजिन बीचक्राफ्ट V35 म्हणून केली. FAA आणि नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड या घटनेची चौकशी करत आहेत.