जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
के. सी. ई च्या पी. जी. महाविद्यालयात “पीजी टेक्नॉलॉजीया 2023” स्पर्धा नुकतीच पार पडली. स्पर्धेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही एस झोपे यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे संयोजन आय. क्यू. ए. सी. समन्वयक प्रा. संदीप पाटील यांनी केले. स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मु. जे महाविद्यालयातील जीवशास्त्र विभागाचे प्रा. मनोज चोपडा यांच्या हस्ते रोख पारितोषिके व प्रमाणपत्र वितरित करण्यात आली. विद्यार्थ्यांतील सादरीकर, व्यक्तिमत्व विकास यासारख्या कलागुणांना,वाव देण्यासाठी पदवीधर विद्यार्थ्यांसाठी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त वित्तमाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेसाठी महाविद्यालयातील व परिसरातील विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूक्ष्मजीवशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी कु. ऋतुजा पाटील यांनी तर आभार डॉ. आर. एम. पाटील यांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थी
भित्तीपत्रक स्पर्धेत लाईफ सायन्स श्रेणीतून- प्रथम पारितोषिक जाधव गायत्री, द्वितीयपारितोषिक राजपूत योगेंद्रसिंग, तृतीय पारितोषिक महाजन ऐश्वर्या. तर केमिकल सायन्स या श्रेणीतून प्रथम पारितोषिक शर्मा सपना द्वितीय तळलेले स्वाती तर तृतीय पारितोषिक विभागून पाटील पवन व तवारी पूजा यांना मिळाले. मॅथेमॅटिकल सायन्स या श्रेणीतून प्रथम पारितोषिकमुझे महाविद्यालयाच्या नेहेते राखी तर द्वितीय पारितोषिक इंगळे तृप्ती यांना मिळाले. व्यावसायिक पत्र लिखाण स्पर्धेत प्रथम पारितोषिक पाटील ऋतुजा, द्वितीय पारितोषिक शर्मा सपना तर तृतीय पारितोषिक निलेश सूर्यवंशी भोळे कॉलेज भुसावल यांना मिळाले.