Monday, August 15, 2022

समाजसेवा रत्न पुरस्काराने जळगावचे पियुष गांधी गोव्यात सन्मानित

- Advertisement -

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

येथील सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यकर्ते तसेच युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी पियुष संजय गांधी यांना उत्कृष्ट सामाजिक कार्याचा आयपीसी अवॉर्ड गोवा येथे शनिवारी ९ एप्रिल रोजी एका कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार माजी केंद्रीय मंत्री अँड.रमाकांत घोलप यांच्या हस्ते देण्यात आला.

- Advertisement -

- Advertisement -

पणजी येथील ब्रिगांजा हॉल येथे १७ व्या राष्ट्रीय आईपीसी अवॉर्ड वितरण पुरस्कार प्रदान सोहळा घेण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय मंत्री ऍड. रमाकांत घोलप, भाजप गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तनावडे, गोव्याचे युवा नेते उत्पल पर्रिकर, आयपीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. परमिंदर पांडे आदी उपस्थित होते.

पुरस्कारार्थींमध्ये सामाजिक कार्यासाठी पियुष गांधी (जळगाव), शिल्पा गांगुली (गोवा), विपीन पाणिग्रही, सागर नाईक (दोन्ही गोवा), इलेकट्रोनिक मीडियाचे अशद शेख यांच्यासह १७ जणांचा समावेश होता. पुरस्कार स्वीकारताना पियुष गांधी यांच्यासोबत जळगावचे व्यापारी रिकेश गांधी उपस्थित होते.

पियुष गांधी यांना आयपीसी अवॉर्ड जाहीर झाल्यामुळे त्यांचे जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, आ. राजुमामा भोळे, महापौर जयश्री महाजन, प्रदीप रायसोनी, राजेश सुरेशदादा जैन, माजी आ.मनीष जैन यांच्यासह विविध मान्यवरांकडून व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.

पियुष गांधी हे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यकर्ते असून युवा सेनाचे उपजिल्हा युवा अधिकारी आहेत. सुमिरा उद्योग समूहाचे संचालक तसेच नेहरू चौक मित्र मंडळातर्फे देखील विविध सामाजिक कामात अग्रेसर आहेत. यासह कोरोना महामारीच्या काळात देखील त्यांनी सामाजिक कार्य बजावले आहे.त्यांच्या विविध क्षेत्रातील व कोरोना महामारी काळातील कार्याची दखल घेऊन त्यांना हा आयपीसी अवार्ड प्रदान करण्यात आला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या