दोन भावांकडे आढळले पिस्टल… एक ताब्यात, दुसरा फरार

0

 

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

येथील एका सराईत गुन्हेगाराला जिवंत तीन काडतुस व दोन मिस फायर झालेले बुलेट हेड सह एक देशी कट्टा घेऊन जाताना मलकापूर शहर पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पो. नि. अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली डीपी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक ईश्वर सोळंके यांच्या नेतृत्वात ही सदरची कारवाही करण्यात आली आहे.

शहर पोलीस स्टेशनचे पो. नि अशोक रत्नपारखी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मलकापूर कडून गणवाडी कडे दोन इसम लाल रंगाची स्कुटी घेऊन त्यात एक देशी कट्टा घेऊन जात आहे या सदर माहितीवरून मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ईश्वर वाघ, सलीम बर्डे, संतोष कुमावत, प्रमोद राठोड यांच्यासह आदी कर्मचाऱ्यांनी तीन साक्षीदारांसह शहर पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुद्वारा नजिक सापळा रचत. त्यांना हात देवून थांबवले त्यात सराईत गुन्हेगार शेख साबीर शेख अहेमद (28) रा . सायकलपुरा मलकापुर जि.बुलढाणा व त्याच्या मागे बसलेला एक इसम स्कुटी थांबताच स्कुटीवरुन उडी घेवून पळु लागला. मात्र त्यास पोकों.आसिफ शेख व पोकों प्रमोद राठोड यांनी पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला असता तो झाडाझुडुपांचा फायदा घेत पळून गेला.

चौकशीच्या आधारे पळून गेलेला इसम हा पकडण्यात आलेल्या आरोपीचा भाऊ शेख तालिब शेख अहमद (25) रा . सायकलपुरा मलकापुर जि.बुलढाणा हा असल्याचे सांगीतले. त्यांच्याकडून वाहन क्रमांक एम.एच 03 ए यु . 7372 मो.सा.चे झडती घेतली असता तिचे डिक्कीमध्ये एक काळया रंगांची पिस्टल ग्रीप असलेली गावठी बनावटीची स्टील बॉडी असलेली पिस्टल व तीन जिवंत काडतुस सह दोन मिस फायर बुलेट हेड मिळुन आले. त्यामुळे त्यांच्यावर कलम 3,25 आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एक आरोपी फरार आहे पुढील तपास मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.