जळगावात गावठी पिस्तूलासह दोघे ताब्यात

0

जळगाव, लोकशाहीन्यूज नेटवर्क

बेकायदेशीररित्या गावठी बनावटीची बंदूक घेऊन फिरणाऱ्या दोघांना शनिवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलिसांनी जळगाव शहरातील अजिंठा चौकातील हॉटेल महाराजासमोरून अटक केली आहे. दरम्यान दोघांकडून २० हजार रुपये किंमतीची गावठी पिस्तूल हस्तगत केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील अजिंठा चौकातील हॉटेल महाराजा परिसरात मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथे राहणारे दोन जण गावठी पिस्तूल घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. या गुप्त माहितीनुसार एमआयडीसी पोलीस कर्मचाऱ्यांनी सायंकाळी ६ वाजता अजिंठा चौकातील हॉटेल महाराजासमोर कारवाई केली.

यावेळी संशयित आरोपी अक्षय प्रकाश घारू (वय २१) आणि नितीन देवी दयाल सालवे (वय २५) दोन्ही रा. शिवाजीनगर, बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश यांना अटक केले आहे. पोलीस नाईक विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता दोघांवर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील करीत आहे..

 

Leave A Reply

Your email address will not be published.