तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

लोकशाही न्यूज नेटवर्क 

पिंपरी : तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. वाकड व पिंपरी येथे ७ ऑक्टोबर २०२१ ते ७ जानेवारी २०२२ या कालावधीत ही घटना घडली.

पंकजकुमार मिश्रा (वय ३४, रा. वाकड) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पीडित महिलेने बुधवारी (दि. २) वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी महिलेसोबत ओळख केली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून महिलेसोबत जबरदस्तीने शरीरसंबंध केले. त्यानंतर महिलेने शारीरिक संबंधास नकार दिला. त्यामुळे आरोपीने फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन महिलेवर लैंगिक अत्याचार केले.

आरोपीचे लग्न झाल्याचे समजल्यानंतर फिर्यादी महिलेने त्याबाबत जाब विचारला असता आरोपीने महिलेला मारहाण केली, असे फिर्यादीत नमूद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here