लोकशाही न्यूज नेटवर्क
पिंप्राळा येथील श्री विठ्ठल मंदिर संस्थान यांची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक १९/०२/२०२६, गुरुवार रोजी श्री विठ्ठल मंदिर, पिंप्राळा येथे अत्यंत उत्साहपूर्ण व सौहार्दपूर्ण वातावरणात संपन्न झाली. सभेत सर्व विषयांवर सविस्तर चर्चा होऊन सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले.
यावेळी झालेल्या त्रैवार्षिक निवडणुकीत नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची तसेच नवीन कार्यकारिणीची बिनविरोध व एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष : मोहनदास पुरूषोत्तम वाणी, उपाध्यक्ष : संजय प्रभाकर वाणी, सचिव : रुपेश विलास वाणी, सहसचिव : अक्षय प्रमोद वाणी, तसेच अनिल पुरूषोत्तम वाणी, सुनील प्रभाकर वाणी, नंदकिशोर लक्ष्मण वाणी यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. यानंतर आमंत्रित सदस्य म्हणून प्रविण वाणी, किशोर वाणी, मयूर पंडित, चंद्रकिरण वाणी, गौरव वाणी यांची नावे जाहीर करण्यात आली.
सर्व सभासदांनी एकमताने ठराव मंजूर करून नव्या पदाधिकाऱ्यांवर विश्वास व्यक्त केला. नवीन कार्यकारिणीच्या निवडीमुळे संस्थेच्या धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यास अधिक बळ मिळणार असून आगामी काळात विविध उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवर व सभासदांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

