Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»पिंप्राळ्यात सराफा व्यावसायिकाला मारहाण करून रोकडसह चांदी लंपास
    जळगाव

    पिंप्राळ्यात सराफा व्यावसायिकाला मारहाण करून रोकडसह चांदी लंपास

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJanuary 7, 2026Updated:January 7, 2026No Comments4 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    crime
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पिंप्राळ्यात सराफा व्यावसायिकाला मारहाण करून रोकडसह चांदी लंपास

    जळगाव: शहरातील पिंप्राळा बाजार परिसरातील ‘साई अलंकार’ या सराफा दुकानात शिरून तीन जणांनी व्यावसायिकाला मारहाण केल्याची खळबळजनक घटना ४ जानेवारी रोजी घडली. हल्लेखोरांनी भगवान विसपुते आणि त्यांचा मुलगा जसवीन यांना मारहाण करत दुकानातून ८ हजार रुपयांची रोकड आणि १५ हजार रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू असा एकूण २३ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दांडेकरनगरचे रहिवासी भगवान हरि विसपुते यांचे पिंप्राळा परिसरात सोने-चांदीचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी भगवान विसपुते आणि त्यांचा मुलगा दुकानात असताना गोलू उर्फ नितेश जाधव, यश पाटील आणि विशाल पाटील (पूर्ण नाव माहीत नाही) हे तिघे जण दुकानात घुसले. या तिघांनी विसपुते पिता-पुत्राला मारहाण करण्यास सुरुवात केली आणि काउंटरमधील रोख रकमेसह चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

    या प्रकरणी भगवान विसपुते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भरवस्तीत सराफा व्यावसायिकावर झालेल्या या हल्ल्यामुळे व्यापारी वर्गात संताप व्यक्त केला जात आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत असून, पोलीस आरोपींच्या शोधात आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026

    बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif