Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पिंपळगाव पोलिसांची दारू भट्ट्यांवर कारवाई
    गुन्हे वार्ता

    पिंपळगाव पोलिसांची दारू भट्ट्यांवर कारवाई

    दीड लाखाचा मुद्देमाल नष्ट : पाच गुन्हे दाखल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 13, 2026No Comments109 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    || लोकशाही न्यूज नेटवर्क ||

    पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत गहुले धरण व बहुळा नदी परिसरातील अवैध हातभट्टी दारू निर्मितीवर आळा घातला. या कारवाईत सुमारे १ लाख ५८ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून संबंधित आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिंदाड बिट हद्दीतील गहुले धरण व बहुळा नदीच्या काठावर काही इसम झाडाझुडपात गावठी हातभट्टी दारू तयार करत आहेत. या माहितीच्या आधारे तत्काळ पोलीस पथक तयार करून छापा टाकण्यात आला.

    गहुले धरण परिसरात आरोपी बुधा दगडू तडवी, फरीदा बुधा तडवी, रहेमान अन्वर तडवी आणि सचिन मनोज तडवी (सर्व रा. शिंदाड, ता. पाचोरा) हे दारू निर्मिती करताना आढळून आले. तसेच बहुळा नदीकाठी सुनिल राजू भिल (रा. इंदिरानगर, लोहारी) व गोपाल नागो राठोड (रा. आंबेवडगाव, ता. पाचोरा) हे देखील अवैध दारू तयार करताना पकडले गेले.

    या कारवाईत पोलिसांनी एकूण ३६०० लिटर कच्चे रसायन (किंमत १,२६,००० रुपये), ४५० लिटर उकळते पक्के रसायन (किंमत १५,७५० रुपये) आणि १६५ लिटर तयार हातभट्टी दारू (किंमत १६,५०० रुपये) असा एकूण ४२१५ लिटर दारूसंबंधित मुद्देमाल जप्त केला. हा सर्व मुद्देमाल घटनास्थळीच नष्ट करण्यात आला तसेच दारूच्या भट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.

    या प्रकरणी सर्व आरोपींविरोधात महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम ६५ (फ), (ब), (क), (ई) अन्वये एकूण पाच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, मोंढाळे येथे स्वतंत्र कारवाईत विनोद अरविंद गुंजाळ हा इसम बसस्थानकाजवळ अवैधरित्या देशी दारू विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून ३८ देशी दारूच्या बाटल्या (किंमत १५२० रुपये) जप्त करून त्याच्याविरोधातही संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या

    May 13, 2026

    तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न

    May 13, 2026

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif