मोटरसायकल चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क 

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) सह परिसरात मोटरसायकल चोरीचे प्रमाण वाढले आहे. पिंपळगाव येथील रमेश दत्तात्रय वाघ यांची मोटार सायकल एम. एच. – १९ – सी. पी. २२५६ ही दि. २३ जुन रोजी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरासमोरून चोरून नेली होती.

सदर प्रकरणी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये  गु. र. नं. १६२ / २०२२ भा. द. वि. ३७९ नुसार दाखल करण्यात आला  होता. दिवसाढवळ्या मोटरसायकल चोरीस जात असल्याच्या तक्रारी पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिस स्टेशनमध्ये करण्यात येत असल्याने पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, पोलिस उपअधीक्षक भारत काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांनी पोलिस नाईक रवींद्र पाटील, पोलिस काॅन्स्टेबल रणजीत पाटील, पंकज सोनावणे, मनोज बडगुजर, संभाजी सरोदे यांचे पथक तयार करुन आरोपी चेतन उर्फ सोनू भोई यास पिंपळगाव (हरेश्र्वर) येथून सदर गुन्ह्यात अटक केली.

दरम्यान त्याच्याकडून रमेश वाघ यांची मोटरसायकल क्रं. एम. एच. १९ – सी. पी. २२५६ ही शिवना येथून हस्तगत केली आहे. या कारवाईमुळे मोटरसायकल चोरट्यांचे धाबे दणाणले असुन पिंपळगाव (हरेश्र्वर) पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.