baltimore aquarium coupons discount tickets home depot online coupon code december 2012 mens electric razors coupons territory ahead coupon code 2013 bp magazine coupon code
Monday, December 5, 2022

दोन वर्षाच्या चिमुरडीला बेदम मारहाण; महिलेवर गुन्हा दाखल

- Advertisement -

पिंपळगाव हरेश्वर, लोकशाही न्यूज नेटवर्क   

- Advertisement -

येथील एका दोन  वर्षाच्या मुलीला शेजारील बाईने अमानुष मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मारहाणीनंतरही एक दिवस लपवाछपवी सुरू असल्याने तीव्र संताप जनतेने व्यक्त केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी याप्रकरणी पिंपळगाव  पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवानी मोहित बडगुजर असे मारहाण झालेल्या मुलीचे नाव आहे.

- Advertisement -

- Advertisement -

शिवानीच्या शरीरावरील जखमा पाहून तिला अमानुषपणे मारहाण झाल्याचा संशय मुलीच्या आईला आला. त्यांनी याची माहिती आजूबाजूला आणि शेजारीण बाईला विचारली असता त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत.

या निर्दयी शेजारीण बाईने अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकलीला जमिनीवर लोळाऊन  चपलीने व काठीने बेदम मारहाण केलीय. मुलगी कळवळत राहिली पण तिच्या निर्दयी बाईच्या दगड मनाला काही पाझर फुटला नाही. या घटनेचा तीव्र निषेध पिंपळगाव हरे येथील जनतेतून होत आहे.

या महिलेचं मुलीच्या आईसोबत जुने वाद होते असं सांगितले जात आहे. याचा राग तिने अवघ्या दोन वर्षाच्या चिमुकलीवर काढला. ही महिला इतकी रागावली होती की तिने लहान मुलीला इतकी बेदम मारहाण केल्यानंतर तिला जीव किती कळवळेल, याचा विचार सुद्धा तिच्या मनात आला नाही. या महिलेने निर्दयीपणे निष्पाप मुलीला मारहाण केली. ही मुलगी तिथे जागेवर बसून ओक्साबोक्शी रडू लागली. यावर महिलेचं समाधान झालं नाही, मग ती  चप्पलने व काठीने  मारहाण करू लागली. महिलेच्या या कृत्याचा तपास  झाल्यानंतर पोलिसांनी महिलेवर पिंपळगाव पोलीस स्टेशनला  गुन्हा दाखल केला आहे.

हे पिंपळगाव येथील पोलीस स्टेशन मागील परिसरातील असल्याचे सांगितले जात आहे. शनिवारी दुपारी हे प्रकरण झाल्याचे समजते. महिलेला एका दहा वर्षाच्या मुलाने मुलीला मारतांना पहिले असता मुलाच्या जाब वरून महिलेवरती गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मुलीचे आई वडील शेतात कामाला गेले असता दुपारी दोन वर्षाची शिवानी शेजारील बाईच्या अंगणात खेळायला गेल्यावरून ही मारहाण करण्यात आली असे सांगिलते जात आहे. संध्याकाळी मुलगीच्या रडण्यावरून व अंगावरील मारलेल्या वळ वरून आईच्या लक्षात आले. आपल्या मुलीला कोणीतरी काठीने मारहाण केली आहे. त्यावरून आईने गल्लीत विचार पूस केली असता एक दहा वर्षाच्या मुलाने सांगितले कि, तुमची मुलगी शेजारील काकूच्या अंगणात खेळायला गेली असता त्या काकुने तिला मारहाण केली. या घटनेमुळे सर्व महिला वर्ग व नागरिकांकडून संतप्त प्रितिक्रिया येत असून दोषींनवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. या घटनेचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश खोंडे करीत आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या