फुलगाव येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

0

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ तालुक्यातील फुलगाव येथे एका तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दि. १२ सोमवार रोजी सकाळी उघडकीस आली.

राहुल मुरलीधर गोसावी (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव असून सोमवारच्या रोजी सकाळच्या सुमारास त्यांच्या राहत्या घराचे छताच्या पत्र्याच्या लोंखडी पाईपला सुताची दोरीने गळ्याभोवती गळफास लावून आत्महत्या केली.

मयत हा मजुरीने वरणगावातील एका शेतकऱ्याकडे कामास होता. मात्र काही दिवसापासून ते कामावर नव्हता. मयत राहुल हा घरात एकटाच राहत होता.

आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही. याबाबत वरणगाव पोलीस स्टेशला महेश गोसावी यांच्या खबरी वरून अकस्मत मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस हे कॉ मधुकर भालशंकर हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.