Saturday, January 28, 2023

जळगावात तरुणीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; बदल्यात मागितले…

- Advertisement -

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

जळगाव सायबर पोलिसात (Jalgaon Cyber Police) एका तरुणीनेचे (by young woman) बनावट अश्लिल फोटो बनवून ते व्हायरल करण्याची धमकी देत खंडणी मागिल्याच्या खळबळजनक घटने प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Sensational incidents of making fake obscene photos and threatening to make them viral and asking for ransom)

- Advertisement -

पिडीत तरुणीने याबाबत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि. 15 ते 21 ऑक्टोबर दरम्यान अज्ञात व्यक्तीने त्याच्या व्हॉटसअप मोबाईल क्रमांक +8801408-372865. +8801614-690909 वरुन तरुणीचा चेहरा असलेला फोटो अश्लील फोटो सोबत मॉर्फ एडीट केला. त्यानंतर ते बनावट अश्लिल फोटो पिडीत तरुणीच्या दोन मैत्रीणींना पाठवले. तसेच ते फोटो अधिक व्हायरल न करण्यासाठी पैशांची मागणी केली. शेवटी तरुणीने जळगाव सायबर पोलिसांना याबद्दल माहिती दिली. यावरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. लिलाधर कानडे हे करीत आहेत.

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे