Friday, May 20, 2022

मोठी बातमी.. खडसेंच्या PAसह जवळच्या कार्यकर्त्याचाही फोन टॅप !

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांना फोन टॅपिंगप्रकरणी कुलाबा पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. रश्मी शुक्ला यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह त्यांचे स्वीय सहाय्यक आणि जवळच्या एका कार्यकर्त्याचाही फोन टॅप केल्याची माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

दरम्यान, पोलिस चौकशीत खडसेंनी त्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली असून हा आपल्या खासगी आयुष्यात डोकवण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितलं आहे. अनेकदा मोठ्या नेत्यांचे खासगी फोन हा स्वीय सहाय्यकाकडे असतो. तसंच राजकीय पुढाऱ्यांशी बोलण्याआधी अनेकजण आधी स्वीय सहाय्यकांकडून संबधित पुढाऱ्याबाबतची विचारपूस करतात त्यामुळेच खडसेंच्याही स्वीय सहाय्यक आणि जवळच्या व्यक्तीचे फोन टॅप केल्याचा संशय पोलिसांना आहे.

दरम्यान या प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवल्यानंतर खडसे यांना दोन दिवसांनी जबाब नोंदवण्यासाठी बोलवलं होत़ं. मात्र, काही कारणास्तव खडसे हे जळगावमध्ये होते. त्यांनी मुंबईत आल्यानंतर खडसेंनीच पोलिसांना संपर्क साधला.

खडसेंनी पोलिस चौकशीत खडसेंनी त्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी नाराजी व्यक्त केली असून हा आपल्या खासगी आयुष्यात डोकवण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितलं आहे. मात्र, हे करून रश्मी शुक्ला यांना काय मिळणार आहे? या मागे नेमका कुणाचा हात आहे. हे पोलिसांनी शोधण गरजेचं असल्याची खडसेंनी पोलिसांना सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या