जुना फोन विकून नवीन घेताय..? मग ‘ही’ खबरदारी नक्की घ्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

वारंवार नवीन फोन वापरायचा असेल, तर जुना फोन विकणे हा सर्वात चांगला पर्याय आहे. तुम्हीदेखील आपला स्मार्टफोन विकून नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे. अ‍ॅपलने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टमध्ये असं सांगितले आहे की, गेल्या दोन वर्षांमध्ये जगातील तब्ब्ल २६० कोटी लोकांचा डेटा लीक झाला. ऑनलाईन हॅकिंग आणि इतर गोष्टींसोबतच, जुन्या स्मार्टफोन मधून डेटा लीक होण्याचे प्रमाण भरपूर आहे. जुन्या फोनमधून खासगी फोटो, व्हिडिओ, मेसेज किंवा अन्य गोष्टी चोरी होण्याचा धोका असतो. त्यामुळे स्मार्टफोन विकण्यापूर्वी काही गोष्टी करणं आवश्यक आहे. आपला स्मार्टफोन विकण्यापूर्वी त्यामधून तुमचे सर्व मेसेज आणि कॉल रेकॉर्ड डिलीट करा.

डेटा बॅकअप
फोटो, व्हिडिओ, डॉक्युमेंट्स अशा गोष्टींचा बॅकअप घेण्यासाठी क्लाउड स्टोरेजची मदत घेऊ शकता. यासाठी गुगल ड्राइव्ह, गुगल फोटोज, ड्रॉपबॉक्स अशा काही सेवांची मदत तुम्ही घेऊ शकता.

लॉगआऊट
एक-एक करून गोष्टी डिलीट करण्यापेक्षा थेट फोनच रिसेट करण्याचा पर्याय तुम्ही वापरू शकता. मात्र, त्यापूर्वी काही गोष्टी करणं गरजेचं आहे. यातील पहिली गोष्ट म्हणजे, सर्व सोशल मीडिया अ‍ॅप्समधून लॉगआऊट करा.

सोबतच, गुगल अकाउंटमधूनही लॉगऑऊट करा. तसच, पेमेंट अप्स आणि इतर महत्वाचे अप्स अनइंस्टॉल करून त्यांचा देता फोनमधून दिलीत कारणंही गरजेचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.