Sunday, November 27, 2022

खरगोनमध्ये पेट्रोल टँकरचा स्फोट, एक ठार, 8 मुलांसह 22 जखमी

- Advertisement -

 

- Advertisement -

खरगोन, लोकशाही न्यूज नेटवर्क:

- Advertisement -

- Advertisement -

मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलने भरलेला टँकर उलटला. बिस्तान पोलीस स्टेशन हद्दीतील मोगरगाव गढी रोडवरील अंजनगाव गावाजवळ ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, टँकर असंतुलित झाला होता. त्यामुळे टँकर उलटल्याची माहिती मिळताच आजूबाजूच्या ग्रामस्थांची गर्दी झाली, आदिवासीबहुल गाव असल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली होती, याच दरम्यान टँकरने अचानक पेट घेतला आणि त्याचा स्फोट झाला, त्या स्फोटामुळे अनेक लोक त्याच्या सपाट्यात आले.

दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर 22 हून अधिक जण जखमी झाले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली व जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये 8 लहान मुले आणि 13 महिला व पुरुषांचा समावेश आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या