Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    • अमृत योजनेच्या निकृष्ट कामाविरोधात मनपावर ‘घागर फोडो’ मोर्चा!
    • इस्रायलमध्ये शिवरायांचा भव्य पुतळा उभारणार
    • कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या केळी उत्पादकांच्या प्रश्नांवर उच्चस्तरीय बैठक
    • पाकिस्तानच्या जवानांचा थेट कामावर येण्यास नकार
    • युवासेना आयोजित जिल्हास्तरीय ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»लोकार्थ»पेट्रोल १८ रुपये, डिझेल २५ रुपयांनी महागण्याची शक्यता
    लोकार्थ

    पेट्रोल १८ रुपये, डिझेल २५ रुपयांनी महागण्याची शक्यता

    इराण-अमेरिकेच्या युद्धाचा भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 11, 2026No Comments637 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    भारतात व्यावसायिक सिलिंडरचा भाव काही दिवसांपूर्वी जवळपास १००० रुपयांनी वाढला. त्यानंतर पेट्रोल-डिझेल दरवाढीचेही संकेत मिळाले आहेत. सरकारी तेल कंपन्यांना दररोज १००० कोटींचा तोटा बसत असल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगत इंधन दरवाढीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत पेट्रोल १८ रुपये, डिझेल २५ रुपयांनी महागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.

    इराण-अमेरिका युद्धाचा परिणाम भारतावर जाणवू लागला आहे. देशात काही दिवसांपूर्वी व्यावसायिक सिलिंडरचा दर वाढला. जागतिक बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किमती वाढल्या. त्याच्या थेट परिणाम भारताच्या बाजारपेठेवर झालाय. काही प्रमाणात पेट्रोल-डिझेलच्या दरातही काही प्रमाणात वाढ झाली. त्यानंतर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल-डिझेल जपून वापरण्याचे आवाहन केलं. यावेळी एका वर्षासाठी विदेश यात्रा, सोने खरेदी करणे टाळण्याचेही मोदींनी आवाहन केलं.

    केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, ‘आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल, नैसर्गिक वायू, LPG चे दर वाढले आहेत. जागतिक पातळीवर कच्चा माल महाग झालाय. परंतु सामान्य जनतेला महागाईच्या झळा सहन कराव्या लागू नयेत, यासाठी देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर ठेवले आहेत. सरकारी कंपन्यांना दररोज १००० कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय. चालू तिमाहीत तोटा १००००० कोटींच्या विक्रमी स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे.

    तज्ज्ञांच्या मते, तेल कंपन्यांना प्रति लिटर पेट्रोलमागे सुमारे १८ रुपये आणि डिझेलमागे २५ रुपयांचा तोटा सहन करावा लागतो. या कंपन्यांना तोटा भरून काढायचा असेल, तर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर १८ रुपये आणि डिझेलच्या दरात २५ रुपयांनी वाढ करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरकार पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत काय निर्णय घेणार, हे येत्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दिल्ली हॉटेलच्या आगीत संपूर्ण कुटुंब उध्वस्त

    June 4, 2026

    ठरले! ‘या’ तारखेला कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन

    June 4, 2026

    राजधानी दिल्ली हादरली : हॉटेलमध्ये मृत्यूचे तांडव!

    June 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif