पुन्हा पेट्रोल डिझेल महागले; पहा आजचे नवे दर

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. यामुळे सर्वसामान्य जनता वैतागली आहे. यातच इंधन दरवाढ काही केल्या थांबत नाहीय. गेल्या काही दिवसांपासून सतत पेट्रोल- डिझेलचे दर दररोज काही पैशांनी वाढताना दिसत आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत.

आज पेट्रोलचे दर तब्बल 120 रुपये प्रति लिटरपर्यंत पोहोचले आहेत. देशातील 5 राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर 15 दिवसांनी ही दरवाढ होण्यास सुरुवात झाली. या दरवाढीतून पेट्रोलच्या दरात तब्बल 9 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ कायम असून आज मंगळवारी पेट्रोलच्या दरात लिटरमागे 80 पैशांची वाढ करण्यात आली. नवीन दरवाढीनुसार पेट्रोल आणि डिझलेच्या किंमती राजधानी दिल्लीत 104.61 आणि 95.87 रुपये प्रति लिटर झाल्या आहेत. तर, मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 119.67  आणि डिझेल 103.92 रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे.

गेल्या दोन आठवड्यात इंधनाची दरवाढ तब्बल 9 ते 10 रुपयांनी झाली आहे. निवडणुकांचे निकाल हाती येताच, 25 दिवसांत 10 रुपयांनी पेट्रोलचे दर वाढले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात परभणी आणि नांदेडमध्ये पेट्रोलचे दर सर्वोच्च आहेत. सोमवारी येथे पेट्रोल 121.23 रुपये, तर डिझेल 101.42 रुपये प्रति लिटर दराने विकले जात होते. तर आज जळगावमध्ये पेट्रोलचे दर 121.35 रुपये आहेत. सुमारे साडेचार महिने पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहिल्यानंतर 22 मार्चपासून त्याचा दररोज आढावा घेतला जात आहे. गेल्या 14 दिवसांपैकी 12 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.