Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    • भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»संपादकीय»पेट्रोल डिझेलची चौथ्यांदा वाढ : पेट्रोल पंपावर हाणामारी!
    संपादकीय

    पेट्रोल डिझेलची चौथ्यांदा वाढ : पेट्रोल पंपावर हाणामारी!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 26, 2026No Comments343 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही संपादकीय लेख

    पेट्रोल डिझेलची चौथ्यांदा वाढ झाली. पेट्रोल 2 रुपये 61 पैसे तर डिझेल 2 रुपये 71 पैशांनी वाढले. गेल्या बारा दिवसात ही चौथी वाढ झाली असून 7 रुपये 50 पैशाची पेट्रोल डिझेल वाढ झाली आहे. ही पेट्रोल डिझेलची भाव वाढ म्हणजे प्रत्यक्ष ग्राहकाच्या खिशाला तर कात्री लागलीच आहे. पण त्याचे अप्रत्यक्ष परिणाम इतर वस्तूंच्या भावांवर देखील होत आहेत. भाजीपाला, औषधी, धान्य आदी वस्तूंच्या भाव वाढीवर त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला तर कात्री लागलीच आहे. त्याचबरोबर गोरगरिबांच्या खिशाला सुद्धा कात्री लागली आहे. सर्वसाधारण नागरिकाला ज्या जीवनावश्यक वस्तू लागतात त्याच जर महागल्या तर किचनचे सर्व गणितच बिघडते नव्हे तर ते गणित बिघडणार आहे. आताच भाजीपाल्याचे भाव आकाशाला भिडले आहेत. तर डिझेलच्या तुटवड्यामुळे भाजीपाल्याची मार्केटमध्ये आवक कमी झाली असून भाजीपाल्याच्या तुटवड्यामुळे भाव गगनाला भिडले आहेत. गहू, बाजरी, तांदूळ, तेलाचे भाव सुद्धा वाढले आहेत. एक पेट्रोल डिझेल भाव वाढ इतर वस्तूंच्या भाव वाढीवर परिणाम करत असते. त्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडीत निघत आहे. महागाईचा सामना करतांना सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. महागाई ही पाचवीला पुजलेली आहे. सबंध देशाचे अर्थशास्त्र बिघडले आहे. जगाचे अर्थशास्त्र पराकोटीला गेले आहे. त्यामुळे येत्या वर्षभरात महागाई काय करेल हे सांगता येत नाही. पेट्रोल डिझेल भाव वाढ ही होतच राहणार. त्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्यामुळे ही वारंवार भाववाढ केली जात आहे. इंधनाचा तुटवडा आपल्या देशापुढे एक महान संकट आहे. पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत. काही ट्रक रस्त्यावर उभे आहेत. त्यांना इंधन मिळत नसल्यानेची तक्रार आहे. पेट्रोल पेक्षा डिझेलचा तुटवडा जास्त होतो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इंधनाच्या टंचाईची झळ बसत आहे. शेतकरी बिचारे त्यांच्या जमिनीची मशागत करण्यात गुंतले आहेत. आणि अशातच त्यांना डिझेलची टंचाई भेडसावत आहे. शेतकरी पेट्रोल पंपावर रांगा लावून आहेत. पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्यामुळे ते त्यांच्या कॅना घेऊन तिथेच झोपतात. एक पेट्रोल पंप चालकाची माणुसकी जागी झाली. त्यांनी त्या मुक्काम करणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतःच्या खर्चाने खिचडी काढीचे जेवण दिले. काही पेट्रोल पंपांवर विचित्र अनुभव येत आहेत. काही पेट्रोल पंपांवर चक्क शेतकऱ्यांमध्ये हाणामारी झाली. म्हणजे पेट्रोल डिझेल मिळवण्यासाठी स्वतःचे डोके फोडून घ्यायची वेळ आली आहे. म्हणजे पैसे देऊन पेट्रोल डिझेल घ्यायचे, त्यावेळी स्वतःचे डोके फोडून घ्यायचे ही परिस्थिती भयानक आहे. आधीच शेतकरी संकटात आहे. त्याच्या खताचे, बी बियाणेचे भाव पराकोटीला गेले असताना आता पेट्रोलही महागले आहे. त्यामुळे दुहेरी तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. डोक्यावर 45 अंश डिग्री सेल्सिअस तापमानातच त्याला काम करावे लागत आहे. पेट्रोल डिझेलसाठी पेट्रोल पंपांवर रांगा लावण्यात येतात ही स्थिती शेतकऱ्यांसाठी अतिगंभीर आहे. ट्रॅक्टर, जेसीबी, मळणी यंत्रासाठी डिझेल लागते. ते नाही मिळाले तर त्याचे काम पूर्णपणे अडून बसते. महाराष्ट्रात महाराष्ट्र शासन म्हणते की पेट्रोल डिझेलची बिलकुल टंचाई नाही. ही साठेबाजी टंचाई निर्माण झाली आहे. साठेबाजामुळे डिझेल टंचाई होत असेल तर पेट्रोल पंप बंद का आहेत? ज्या पेट्रोल पंपांवर दिवसभर पेट्रोल डिझेल मिळावे तेथे फक्त सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेतच पेट्रोल डिझेल दिले जाते. ही वस्तुस्थिती असताना महाराष्ट्र शासन काही तरी वेगळेच सांगते आहे. पेट्रोल पंपांवर तर कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात येते. एका कर्मचाऱ्याला तर चाकूने भोसकले. हे विदारक चित्र नाही का..?

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!

    September 6, 2026

    अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!

    September 3, 2026

    महामार्ग कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

    September 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif