Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    गुन्हे वार्ता

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची माहिती
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 19, 2026No Comments1,241 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    महाराष्ट्राचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व बदनामीकारक पोस्ट प्रसारित करणाऱ्या आरोपीला जळगाव सायबर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली असून त्याच्याविरुद्ध लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे सामाजिक माध्यमांद्वारे बदनामी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

    या प्रकरणी जळगाव महानगरपालिकेचे नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी १९ जून २०२६ रोजी सायबर पोलीस ठाणे, जळगाव येथे अधिकृत फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार, “भारत बालाजी म्हस्के” या नावाने चालविण्यात येणाऱ्या फेसबुक खात्यावरून मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या एका मुलीसोबतचा फोटो वापरून आक्षेपार्ह स्वरूपाची पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली होती. या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३५६(३) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(क) व ६७ अन्वये गुन्हा दाखल केला.

    तक्रार दाखल झाल्यानंतर जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला गती देण्याचे निर्देश दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर तसेच सायबर पोलिसांच्या विशेष पथकाने जवळपास महिनाभर सातत्याने तांत्रिक तपास, डिजिटल विश्लेषण आणि विविध इलेक्ट्रॉनिक पुराव्यांचा अभ्यास करून आरोपीचा शोध सुरू ठेवला. अत्यंत संयम, व्यावसायिक कौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आरोपीपर्यंत पोहोचण्यात सायबर पोलिसांना अखेर यश आले.

    तपासादरम्यान आरोपी भरत बालाजी म्हस्के (वय ३४) याचा ठावठिकाणा निष्पन्न झाला. त्याला इंदापूर, ता. इंदापूर, जि. पुणे येथून ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान आरोपीने संबंधित पोस्ट केल्याची कबुली दिली. गुन्ह्यात वापरण्यात आलेला सुमारे ३० हजार रुपये किमतीचा ओप्पो रेनो १५ फाइव्ह जी मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे.

    या प्रकरणात आरोपीस भारतीय न्याय संहिता कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावण्यात आली असून तपास अंतिम टप्प्यात आहे. आवश्यक पुरावे संकलित करण्याचे काम पूर्ण होत असून आरोपीविरुद्ध लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे.

    दरम्यान, आरोपीने प्रसिद्ध केलेली आक्षेपार्ह पोस्ट यापूर्वीच सामाजिक माध्यमावरून हटविण्यात आली आहे. तसेच आरोपीचे सुमारे सहा हजार अनुयायी असलेले फेसबुक खाते कायमस्वरूपी बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

    या संपूर्ण कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे विशेष कौतुक होत असून, त्यांनी तांत्रिक तपासाला योग्य दिशा देत प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आरोपीपर्यंत पोहोचणे शक्य झाल्याची भावना व्यक्त होत आहे. तसेच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर आणि जळगाव सायबर पोलीस ठाण्याच्या संपूर्ण तपास पथकाने अत्यंत व्यावसायिक पद्धतीने काम करत सायबर गुन्ह्यांच्या तपासात पुन्हा एकदा आपली कार्यक्षमता सिद्ध केली आहे.

    नगरसेवक अरविंद देशमुख यांनी केलेल्या तक्रारीची तत्पर दखल घेऊन अल्पावधीत आरोपीला अटक करणाऱ्या जळगाव सायबर पोलिसांचे नागरिकांकडूनही कौतुक होत असून, सामाजिक माध्यमांचा गैरवापर करून कोणाचीही बदनामी करणाऱ्यांविरुद्ध कायदा कठोर कारवाई करेल, असा ठोस संदेश या कारवाईतून गेला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif