Sunday, May 29, 2022

मिसेस रायगड स्पर्धेत डोंबिवलीच्या सपना म्हात्रे विजेत्या

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क   

- Advertisement -

“सर्वांसाठी सर्वकाही” अशी ख्याती असलेल्या स्वररंग पेण फेस्टिवल मध्ये बुधवारी झालेल्या मिसेस रायगड स्पर्धेत डोंबिवलीच्या सौ.सपना म्हात्रे यांनी मिसेस रायगडचे विजेते पद पटकावले. तर कल्याणच्या सौ.स्वाती रवींद्र जुवारे यांनी उपविजेते व रोह्याच्या सौ.रितिका राकेश भास्कर यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जिंकले.

- Advertisement -

तसेच या स्पर्धेतील बेस्ट कॉस्टयूमच सौ.कृतिका अजिंक्य सुटे (रोहा), बेस्ट स्माईल सौ.पूर्णिमा योगेश प्रधान (पेण), बेस्ट पर्सनॅलिटी सौ.कांचन कुंदन म्हात्रे (पाटणेश्वर-पेण), बेस्ट फोटोजनिक सौ.अनुराधा राज (पेण), बेस्ट हेअर सौ.रुपम लाभेश पाटील (अलिबाग), बेस्ट कॅटवॉक सौ.साक्षी सिद्धेश देवरुखकर (अलिबाग) या स्पर्धकांनी पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला.

विजेत्यांना स्वररंगचे अध्यक्ष प्रा.राजेंद्र साळवी, खजिनदार भारती साळवी, स्वररंगचे उपाध्यक्ष सुनिल पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक मीनल शिंदे, सचिव कौस्तुभ भिडे, स्नेहल सावंत, कविता झेमसे, समीर घासे, किरण गुरव, पेण प्रेस क्लबचे अध्यक्ष देवा पेरवी, अनिरुद्ध पवार, सारिका पाटील, शाल्मली भिडे, अक्षता साळवी, संदेश वर्तक, यश बांदिवडेकर, प्रेरणा रामधरणे, प्रसाद म्हात्रे, सुनिल तोंडलेकर, तन्मय शिर्के, आदी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.

इंट्रोडक्शन राऊंड आणि आणि ट्रॅडिशनल साडी राउंड अश्या दोन राउंड मध्ये कोरिओग्राफर शैलेश साळुंखे (रोहा) यांनी साकारलेल्या या स्पर्धेत सर्वच सौभाग्यवती स्पर्धकांनी आपल्या कला नैपुण्याचे उत्तम प्रदर्शन केले. मुंबई येथील निवेदक परेश दाभोळकर यांच्या उत्तम समालोचनाची साथ या स्पर्धेला लाभली. स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून स्नेहल सुरेश सावंत, कविता झेमसे यांनी काम पाहिले.

या स्पर्धेत डोंबिवली, ठाणे, पुणे, कल्याण, अलिबाग, न्यु पनवेल, खारेगाव-कळवा, उरण, पेण, रोहा, बोरिवली, कुर्ला आदि विविध भागांतील एकूण 19 सौभाग्यवती सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या