Friday, December 9, 2022

मतिमंद मुलांनी तयार केल्या शेकडो गुढी !

- Advertisement -

पेण, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

होळी, रंगोत्सवानंतर आता घरोघरी गुढीपाडव्याची तयारी सुरू झाली आहे. आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या गुढीपाडव्यासाठी लागणारे साखरेच्या गाठी म्हणजे हार-कड्याचीही दुकाने सजू लागली आहेत. गुढी पाडव्यासाठी लागणारी गुढी ही तितकिच महत्वाची यासाठी लागणारे बांबू, गडवे, सूती कापड बाजारात विक्रीसाठी आले आहेत. मात्र पेण येथील आई डे केअर या मतिमंद मुलांनी निसर्गाचा समतोल राखावा आणि डोंगराची / जमिनीची माती घट्ट धरून ठेवणारा आणि मातीची धुप रोखणारा बांबू या वृक्षाची कत्तल थांबावी यासाठी पुढाकार घेऊन रेडी मेड गुढी तयार करण्याचा संकल्प आखुन तो सत्यातही उतरविला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

भारतीय आणि सौर राष्ट्रीय पंचांगानुसार वर्षाचा पहिला महिना चैत्र आहे. सूर्य जेव्हा मेष राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भारतीय सौर चैत्र महिना सुरू होतो. चैत्र महिन्यात वसंत ऋतूची सुरुवात होते. नवीन शकसंवत्सर हे चैत्र शुद्ध प्रतिपदेला, गुढी पाडव्याच्या दिवशी सुरू होते. गुढी उभारून नववर्षाचे स्वागत केले जाते. यंदाच्या वर्षी मराठी नववर्ष, ०२ एप्रिल २०२२ रोजी चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा आहे. त्या पार्श्वभूमीवर नेहमीच अभिनव उपक्रमासाठी प्रसिद्ध असलेल्या पेण येथील आई डे केअर संस्था संचलित मतिमंद मुलांसाठी व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण केंद्र पेण येथील १८ ते अगदी ५८ वर्षे वय असलेल्या मतिमंद मुलांची गुढी बनविण्यासाठी लगबग सुरू आहे.

मागील दोन महिन्यापासून ही मतिमंद मुले गुढी बनवून स्वयंरोजगार निर्मिती करीत आहेत. यात ११ मुलांचा समावेश आहे. ही मुले जरी मतिमंद, दृष्टिदोष आणि मूकबधिर असली तरी या मुलांमध्ये काही विशेष गुण आहेत जे त्यांच्यात बालपनापासूनच आहेत. हे सुप्तगुण आई डे केअर या मतिमंद मुलांना व्यवसाय प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेच्या संस्थापिका स्वाति मोहिते यांनी ओळखले आणि या मुलांना स्वतः च्या पायावर उभे करण्याचा संकल्पकेला आणि तो तडिस् नेला.

प्रत्येक सणा निमित्त बाजाराच्या गरजे नुसार ही मुले निर्मिती करतात. गणपतीला उंदीर, दिवाळीला पणत्या, रक्षाबंधनला राख्या, कोरोना काळात हजारो मास्क या मुलांनी बनविले होते. या वस्तु बनवून काही पैसे या मुलांनी कमविले आहेत. गुढी पाडव्या निमित्त बनविलेल्या गुढ़ींना रायगड तसेच मुंबई आणि नवी मुंबई येथे चांगली मागणी आहे. दर वर्षी लोखंडी स्टॅंडने तयार होणाऱ्या गुढीसाठी यावर्षी संस्थेतील विशेष शिक्षक रामचंद्र गावंड यांनी लाकडी चौकोन तयार करून त्यामध्ये ड्रिल मशिनच्या साह्याने होल करून त्यामध्ये बांबूची बारीक काठी अडकवली व गुढी स्टॅन्ड तयार केले व विद्यार्थ्यांनाही त्यांनी शिकविले.

गेल्यावर्षी या मुलांनी २५ गुढी तयार केल्या होत्या, यावर्षी या मुलांनी ११० गुढी तयार केल्या आहेत. यात १० इंच उंचीच्या गुढीचा आणि ४४ इंच लांब आणि ४२ इंच रुंद शिवलेल्या सूती कापडाचा समावेश आहे. या सूती कापडाचे शिवणकाम विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम संस्थेच्या विशेष शिक्षिका निशा पाटील यांनी केले. या गुढीची किंमत २०० रूपयांपासून ३०० रूपये आणि ४४ इंच लांब सूती कापडाची किंमत १४० ते २०० रूपयांपर्यंत आहे. लाकडी ठोकळयावर रचलेल्या लाकडी काठी असलेल्या गुढीला रेशमी, सूती कपड़ा आणि त्यावर ताब्याचा किंवा स्टीलचा गढवा (तांब्या) रचलेला आहे.

या गुढी फक्त गुढीपाडव्यासाठीच नाही तर आपला मराठमोळा पाडवा, नविन वर्ष रोज साजरा करता यावे यासाठी ऑफिस आणि घरी ही कायमस्वरूपी ठेवता येईल अशा या गुढी आहेत. त्यामुळे ग्राहकांनी आमच्या विशेष मुलांनी स्वहस्ते बनविलेल्या वस्तु आणि कलाकृती खरेदी करून या मुलांच्या विशेष कल्पकतेला आणि मेहनतीला प्रोत्साहन द्यावे असे आवाहन संस्थेच्या संस्थापिका स्वाति मोहिते यांनी केले.

पेण शरातील आणि तालुक्यातील ५४ मतिमंद मुले आमच्या संस्थेमध्ये शिक्षण आणि प्रशिक्षण घेत आहेत. समाजाने या मुलांची अहवेलना न करता समाजात या मुलांना मानाने आणि स्वतः च्या पायावर कसे उभे करता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आज ३ वर्षापासून ५८ वर्षे वय असलेल्या मुलांचा या विद्यार्थांमध्ये समावेश आहे. व्यावसायिक प्रशिक्षण ज्यात कागदी पिशव्या बनविणे, मेणबत्तीपासून गणपतींसाठी उंदीर, दिवाळीत पणत्या, मास्क आदी वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण या मुलांना संस्थेमार्फत दिले जाते. आणि ५०० रुपयांपासून ४ हजार रूपयांपर्यंत या मुलांना मानधन दिले जाते.
– स्वाती मोहिते, संस्थापिका – आई डे केअर संस्था

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या